एप्रिल फुलचे मेसेजेस यंदा नकोच कारण कोरोना वायरसच्या संकटांशी लढताना थट्टेला स्थान नाही

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 मार्च 2020

उद्या एप्रिल १आहे. दर वर्षी आपण एप्रिल फूलचे खूप जोक्स करतो. पण कोरोना वायरस च्या संकटांशी लढताना थट्टेला स्थान नाही. सगळ्यांना अनुरोध की असंच करू नये. अन्यथा पोलिस व सायबर सेल मार्फत कठोर कार्रवाई केली जाईल..

मुंबई - एक एप्रिल, म्हणजे एप्रिल फुल डे. या दिवशी आपण मजा म्हणून अनेकांना एप्रिल फुल बनवत असतो. एप्रिल फुल डे ची एक वेगळी मजा आपण दरवर्षी लुटत असतो. मात्र देशभरात सध्या लॉकडाऊन आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एप्रिल फुलचे कोणतेही मेसेजेस सोशल मीडियाच्या माध्यमातून न पाठवण्याचं आवाहन केलंय.    

कर्जाचा EMI भरायचा का नाही ? नागरिकांनी काय करायला हवं, वाचा स्पेशल रिपोर्ट

एप्रिल फुलच्या माध्यमातून अनेक अफवा पसरण्याची मोठी शक्यता आहे. अशात आपण कोरोनाच्या सावटाखाली असल्याने एप्रिल फुल च्या माध्यमातून अशा काही गोष्टी पसरू शकतात, ज्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. याव्यतिरिक्त असेही मेसेजेस फॉरवर्ड होतात ज्याच्यामाध्यमातून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी चुकीच्या उपाययोजनांचे संदेशदेखील मोठ्या प्रमाणात पसरू शकतात. त्यामुळे दरवर्षी आपण एप्रिल फूलचे खूप जोक्स करतो. पण कोरोना वायरसच्या संकटांशी लढताना थट्टेला स्थान नाही. अन्यथा पोलिस व सायबर सेल यांच्यामार्फत कठोर कार्रवाई केली जाईल, असं अनिल देशमुख म्हणालेत.  

लॉकडाऊनमध्ये फ्लिपकार्ट, ऍमेझॉन ने सुरु केलीये 'ही'अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा...

जगभराप्रमाणे भारतात देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता वाढताना पाहायला मिळतेय. भारतात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२०० वर गेलीये. महाराष्ट्रात देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दररोज वाढतेय. महाराष्ट्रात आतापर्यंत १० जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी बळी गेलाय. अशात सरकारकडून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून हरतऱ्हेची खबरदारी घेण्यात येतेय. अशात बुधवारी, म्हणजेच एप्रिल फुल दिवशी कुणीही एप्रिल फुलचे मेसेजेस पाठवू नये, नाहीतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असं  गृहमंत्री अनिल देशमुख म्हणालेत. 

maharashtra home minister anil dekhmukh request citizens not to forward april foll messages


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra home minister anil dekhmukh request citizens not to forward april foll messages