वाढदिवसाच्या निमित्तानं गृहनिर्माण मंत्र्यांकडून कौतुकास्पद कामगिरी करत केलं 'हे' आवाहन

पूजा विचारे
Thursday, 6 August 2020

कोरोनावर मात केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ब्लड लाईन या रक्तपेढीमध्ये जाऊन प्लाझ्मादान केलं आहे.

मुंबईः कोरोना व्हायरस सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आहे. अशातच राज्यातल्या अनेक नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. सध्या काही नेते कोरोनावर उपचार घेत आहेत तर काहींनी यशस्वीरित्या कोरोनाला हरवलं. काही दिवसांपूर्वी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर काही दिवसांमध्येच त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. 

दरम्यान, कोरोनावर मात केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ब्लड लाईन या रक्तपेढीमध्ये जाऊन प्लाझ्मादान केलं आहे. ट्विट करुन त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.  यासोबतच कोरोनामुक्त झालेल्या सर्वच रुग्णांनी प्लाझ्मादान करावं, जेणेकरुन इतर रुग्णांना त्याचा लाभ होईल असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी देखील प्लाझ्मा दान केले आहे.

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी आपला प्लाझ्मा दान करण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेकदा केली आहे. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी देखील प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला. 

हेही वाचाः  वसई- विरारमधल्या नोकरदारांचे हाल, सलग दुसऱ्या दिवशी बस प्रवाशांना फटका

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करू नये. ठाणे शहरात कोणत्याही प्रकारचे होर्डिंग्ज लावू नये; त्याऐवजी कोविडयोद्धे आणि गोरगरीब जनतेसाठी लाभदायक उपक्रम राबवा, असे आवाहन आव्हाड यांनी केलं होतं. आव्हाडांनी केलेल्या आवाहनानंतर कार्यकर्त्यांनीही ठिकठिकाणी अन्नधान्यवाटप, सॅनिटायझर, मास्कवाटप असे उपक्रम राबविले. ठाणे-मुंबईमध्ये सहा ठिकाणीच प्लाझ्मा संकलन करण्यात येत होते.

प्लाझ्मा दान करणार असल्याची माहिती आधीच आव्हाडांनी ट्विटरवरुन दिली होती. त्या ट्विट त्यांनी लिहिलं होतं की, जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत ट्विट करत म्हटले आहे की, मतदार संघात लोकसेवा करत असताना अचानक कोरोनाचा संसर्ग झाला.आपल्या सर्वांच्या अशीर्वादाने यातुन मी बराही झालो.मी माझा प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेत आहे.येत्या दोन दिवसात मी हाॅस्पीटलमध्ये जावुन प्लाझ्मा डोनेट करणार आहे.

अधिक वाचाः मुंबईत मुसळधार पावसामुळे खचला 'हा' प्रसिद्ध रस्ता, मलबा हटवण्याचं काम सुरु

तसंच कोरोनाची लागण झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर मुलुंडमधल्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर त्यांच्यावर कोरोनाचे उपचार करण्यात आले.

Maharashtra Housing Minister Jitendra Awhad COVID 19 donate his plasma


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Housing Minister Jitendra Awhad COVID 19 donate his plasma