Manoj Katke and Devendra Fadnavis
Manoj Katke and Devendra FadnavisSakal

ठाकरे सरकारच्या काळात महाराष्ट्राची अधोगती होतेय : फडणवीस

डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात कार्यकर्ते मनोज कटके यांच्यावर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी एम्स रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली.
Summary

डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात कार्यकर्ते मनोज कटके यांच्यावर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी एम्स रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली.

डोंबिवली - डोंबिवलीतील भाजपा कार्यकर्ता मनोज कटके (Manoj Katke) यांच्यावर हल्ला (Attack) होऊन काही दिवस उलटले. मात्र पोलीस अद्याप आरोपींचा (Accused) शोध घेऊ शकते नाही. हल्ला करणाऱ्या आरोपींना शोधून त्यांच्यावर ठोस कारवाई (Crime) केली पाहिजे. पोलीस राजकीय दबावात (Political Pressure) काम करत असतील तर याबाबत विधानसभेत प्रश्न उचलू. वेळप्रसंगी मोर्चा देखील काढू आणि मी त्या मोर्चात सहभागी होणार, पोलीस ठाण्याला घेराव करणार असे विधान राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी डोंबिवलीत केले.

डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात कार्यकर्ते कटके यांच्यावर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी एम्स रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, राजकारणातलं गुन्हेगारीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याला पूर्णपणे संरक्षण हे शासनाकडून मिळत असून हे गंभीर आहे. पोलीस दल याआधी कधीच एवढ्या राजकीय दबावाखाली काम करत नव्हते मात्र आता राजकीय दबाव दिसतो. महाराष्ट्र अधोगतिकडे जात आहे, ते महाराष्ट्राच्या हिताचे नाही.

Manoj Katke and Devendra Fadnavis
सीमेच्या पलीकडे गेल्यानंतर नरकातून स्वर्गात आल्यासारखे वाटले; ऐश्वर्या राठोड

महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी हे अतिशय घातक आहे असे फडणवीस यांनी सांगितले. पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता हल्लेखोरांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी पोलिसांना सूचना असल्याचे ते बोलले.

इतकेच नव्हेतर डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोकाशीपाडा येथील शेतकऱ्यावर झालेल्या हल्ल्याबाबत आणि गुन्हा उशिराने दाखल करण्याबाबत त्यांनी टीका केली.

यावेळी भाजप आमदार रवींद्र चव्हाण आमदार गणपत गायकवाड जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे माजी नगरसेवक विकास म्हात्रे, शैलेश धात्रक, राहुल दामले, मोरेश्वर भोईर आणि संदीप माळी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com