विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक जाहीर; दहाव्या जागेसाठी सस्पेन्स

राज्यसभेच्या निवडणुकीपाठोपाठ आता विधान परिषदेची निवडणुकही रंगत आणणार आहे.
vidhan-bhavan
vidhan-bhavansakal media

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीपाठोपाठ आता विधान परिषदेची निवडणुकही रंगत आणणार आहे. (Maharashtra Legislative Council elections announced Poll on June 20)

vidhan-bhavan
यासिन मलिकवरुन अमित मिश्रानं शाहीद अफ्रिदीला सुनावलं; केली बोलती बंद

निवडणूक आयोगाकडून देशातील उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार या तीन राज्यांतील विधानपरिषदेच्या निवडणूक कार्यक्रमाची बुधवारी घोषणा केली. या तीनही राज्यातील एकूण ३० जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १० जागांचा समावेश आहे.

कसा असेल निवडणूक कार्यक्रम?

नोटिफिकेशन - २ जून २०२२ रोजी

उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस - ९ जून २०२२

उमेदवारांच्या अर्जांची छाननी - १० जून २०२२

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस - १३ जून २०२२

मतदानाचा दिनांक - २० जून २०२२

मतदानाची वेळ - सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत

मतमोजणीचा दिनांक - २० जून २०२२ (सायंकाळी ५ वाजता)

'या' सभासदांचा संपतोय कार्यकाळ

सदाशिव खोत, सुजीतसिंह ठाकूर, प्रवीण दरेकर, सुभाष देसाई, रामराजे नाईक-निंबाळकर, संजय दौंड, विनायक मेटे, प्रसाद लाड, दिवाकर रावते, रामनिवास सिंह या दहा मंत्र्यांचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपत असल्यानं या जागांवर निवडणूक होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com