संजय राऊतांच ट्विट, म्हणतायत "राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये"

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 April 2020

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची राज्यपाल सदस्य म्हणून विधानपरिषदेवर नियुक्ती करावी असा प्रस्ताव पाठवून 10 दिवस उलटून गेले आहेत. मात्र अजूनही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यावर कुठलाही निर्णय घेतला नाही.

मुंबई - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची राज्यपाल सदस्य म्हणून विधानपरिषदेवर नियुक्ती करावी असा प्रस्ताव पाठवून 10 दिवस उलटून गेले आहेत. मात्र अजूनही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यावर कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी राजभवनाला आपल्या टिकेचं लक्ष्य केल आहे. शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्ल्लज्य राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. या शब्दात राज्यपालांवर शरसंधान केलं. 

धक्कादायक ! तुम्हा आम्हाला रात्रंदिवस बातम्या देणारे मुंबईतील ५१ पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह ! - सूत्र
 

10 दिवस उलटून गेले आहेत. राज्यपालांनीं सरकारच्या प्रस्तावावर निर्णय घेतला नाही. ही फाईल काय कंत्राटाची, भ्रष्ट्राचाराची आहे का असा प्रश्नही खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलतांना उपस्थित केला. 

गजानन महाराजांविषयीच्या 'त्या' दाव्याबद्दल आयुष मंत्रालय करणार अभ्यास!

उद्धव ठाकरे सध्या कुठल्याचं सभागृहाचे सदस्य नाही. त्यांना 6 महिन्याच्या आत सदस्य म्हणून निवडूण यावे लागणार आहे. अन्यथा त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागेल. सध्या कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे या परिस्थितीत उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर नेमणूक करण्याचा प्रस्ताव मंत्रिमडळाने पारीत केला होता.

"समुद्रातील मासे खाऊ नका, कारण कोरोनाचे मृतदेह फेकले जातायत समुद्रात !" काय आहे सत्य असत्य...

कोण आहे रामलाल 

1983 मध्ये रामलाल हे आंध्रप्रदेशचे राज्यपाल असतांना त्यांनी घटबाह्य रितीने तत्कालीन मुख्यमंत्री एन टी रामाराव यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवलं होत. एन टी रामाराव हे अमेरिकेत शस्तक्रिया करण्यासाठी अमेरिकेत गेले होत. या काळात रामलाल यांनी त्यांची मुख्यमंत्रीपदावरुन हकालपट्टी केली. राज्यपालांच्या या कृतीमुळे  मोठा राजकीय वाद उफाळला. अखेर राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करुन एन टी रामाराव यांची मुख्यमंत्रीपदी पुन्हा नेमणूक केली होती. आणि रामलाल यांना राज्यपालपदावरुन हटवले होते.

maharashtra MP sanjay rauts tweet on corona crisis and politics in maharashtra


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra MP sanjay rauts tweet on corona crisis and politics in maharashtra