महाराष्ट्र बंद चित्रनगरीत शांतता 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 4 जानेवारी 2018

मुंबई -  "महाराष्ट्र बंद'चा फटका गोरेगाव येथील चित्रनगरीतील काही मालिकांच्या चित्रीकरणालाही बसला. नेहमीच वर्दळ असणाऱ्या फिल्मसिटीत बुधवारी (ता. 3) शुकशुकाट होता; तसेच मल्टिप्लेक्‍स आणि एकपडदा चित्रपटगृहांतील चित्रपटांचे शो रद्द करण्यात आले होते. 

फिल्मसिटीसह अन्य काही ठिकाणचे चित्रीकरण बंद होते. मालाड-मढ येथील बंगल्यात काही ठिकाणी चित्रीकरण सुरू होते. मात्र, गोरेगाव येथील फिल्मसिटीकडे जाणारे रस्ते आंदोलकांनी अडवल्याने हिंदी आणि मराठी मालिकांचे चित्रीकरण बंद ठेवण्यात आले होते. फिल्मसिटीच्या प्रवेशद्वारावर आणि परिसरात सुरक्षारक्षकांव्यतिरिक्त कोणीच फिरकले नाही. शहरातील अनेक चित्रपटगृहांतील मल्टिप्लेक्‍स आणि सिंगल स्क्रीनमधील चित्रपटांच्या शोसह दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात होणारा "ढाई अक्षर प्रेम के' या नाटकाचा प्रयोगही रद्द करण्यात आला. 

ठाण्यात चित्रीकरण 
ठाण्यात सगळ्या मालिकांचे चित्रीकरण व्यवस्थित सुरू होते. सकाळी लवकरच कलाकारांनी चित्रीकरणाच्या दिशेने प्रवास केला होता. त्यापूर्वी कोणतेही "रास्ता रोको' न झाल्यामुळे सर्व कलाकार वेळेवर चित्रीकरणाच्या ठिकाणी पोचले. 

Web Title: maharashtra news Maharashtra Bandh Koregaon Bhima Clash chitranagari goregaon