एसटीचे दोन दिवसांत 30 कोटींचे नुकसान 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

मुंबई - कोरेगाव-भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ उमटलेल्या पडसादाचा एसटीच्या राज्यभरातील सेवेवर मोठा परिणाम झाला. या घटनेमुळे मंगळवार (ता. 2) आणि बुधवारी (ता. 3) एसटीच्या बस नियमित धावल्या नाहीत. यामुळे या दोन दिवसांत एसटी महामंडळाचा तब्बल 30 कोटींचा महसूल बुडाला. 

राज्यभरात मंगळवारी ठिकठिकाणी करण्यात आलेल्या आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी एसटी आगारातील बसना लक्ष्य करीत एसटीवर दगडफेक केली होती. त्यामुळे एसटी बसच्या खिडक्‍या आणि दर्शनी भागातील काचा फुटल्या. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बुधवारी महाराष्ट्र बंदच्या वेळी राज्यातील एसटी बस रस्त्यावर धावल्याच नाहीत. मंगळवारी आंदोलनादरम्यान एसटीच्या राज्यभरात 168 बसचे नुकसान झाले. बुधवारी बंदमुळे एसटीच्या 26 बसचे नुकसान झाले. 

एसटीच्या राज्यभरातील 250 आगारांपैकी 213 आगार बुधवारी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या एसटीचा दोन दिवसांत 30 कोटींचा महसूल बुडाला; तर एसटी बसची तोडफोड करण्यात आल्याने एसटीचे अंदाजे दोन कोटी 50 लाखांचे नुकसान झाले. दिवसभरात एसटीची बस सेवा बंद असल्यामुळे खेड्यापाड्यातील वाहतूक व्यवस्था ठप्प होती. याचा फटका सामान्य प्रवाशांना बसला. बंद मागे घेतल्यांनतर सायंकाळी सातनंतर एसटीची वाहतूक सुरू झाली, अशी माहिती एसटीच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली. 

Web Title: maharashtra news MSRTC ST bus Maharashtra Bandh Koregaon Bhima Clash