पावसाळी अधिवेशनापूर्वी दुपारी शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

शिवसेना भवनात दुपारी १२ वाजता ही बैठक होईल.

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक आज दुपारी होणार आहे. शिवसेनेचे राज्यातले सर्व संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुख यांची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावली आहे.

या बैठकीला शिवसेनेचे सर्व मंत्रीदेखील उपस्थित राहणार आहेत. शिवसेना भवनात दुपारी १२ वाजता ही बैठक होईल. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेनेची भूमिका कशी असावी, या संदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

शेतकरी कर्जमाफीसह इतर अनेक विषयांमध्ये शिवसेनेनं सातत्यानं आक्रमक भूमिका घेतलीय. सत्तेत असतानाही शिवसेनेनं अनेकवेळा सरकारविरोधी भूमिका घेतलीय. या पार्श्वभूमीवर शिवसेनेची पुढची भूमिका कशी असावी, याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Web Title: maharashtra news mumbai news monsoon session shiv sena meeting