कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न गांभीर्याने घ्या 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जुलै 2017

मुंबई - तुरुंगात कैदी महिलेचा मृत्यू होणे हा प्रकार गंभीर आहे. कैद्यांची सुरक्षा महत्त्वाची असून, त्यात राज्य सरकारने लक्ष घालणे आवश्‍यक आहे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने शुक्रवारी कैदी मंजुळा शेट्ये यांच्या मृत्यूबाबत चिंता व्यक्त केली. 

तुरुंगातील अपुऱ्या सोई-सुविधा आणि कैद्यांच्या सुरक्षेबाबतच्या जनहित याचिकेवर न्यायालयात आज सुनावणी झाली. तुरुंगांची क्षमता, तेथील स्वच्छता, सोई-सुविधा, कैद्यांची आरोग्यतपासणी याबाबत अन्य न्यायालयांमध्ये सामाजिक संस्थांनी याचिका दाखल केल्या आहेत. त्यामध्ये सुरक्षेच्या मुद्द्याचा उल्लेख आहे का, याची माहिती घेण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारी वकिलांना दिले. कैद्यांच्या सुरक्षेचा मुद्दा त्या याचिकांमध्ये नसेल, तर त्याचा समावेश करावा, असे आदेश न्यायाधीश आर. एम. सावंत आणि साधना जाधव यांच्या खंडपीठाने दिले. याचिकेवर एक आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे. 

न्यायालयाच्या अन्य एका खंडपीठाने राज्य सरकारला चार महिन्यांपूर्वी तुरुंगांमध्ये सोई-सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने सहा महिन्यांत कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते; मात्र अजून सरकारने फारशी हालचाल न केल्यामुळे गुरुवारी (ता. 29) झालेल्या सुनावणीत न्यायाधीश अभय ओक यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली होती. 

Web Title: maharashtra news Prisoner security jail