राज्यातील पहिला अत्याधुनिक तुरुंग लवकरच मंडाल्यात

मंगेश सौंदाळकर 
शुक्रवार, 2 जून 2017

मुंबई - उच्चस्तरीय सुरक्षा असलेले राज्यातील पहिला तुरुंग मानखुर्दनजीकच्या मंडाला येथे उभारला जाणार आहे. तेथे सीसी टीव्ही कॅमेऱ्यांपासून अत्याधुनिक इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे बसवली जाणार आहेत. या तुरुंगासाठी जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ते बांधून झाल्यावर तेथे अतिमहत्त्वाच्या कैद्यांना ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आर्थर रोड, ठाणे आणि तळोजा तुरुंगांवरील भार कमी होऊ शकेल.

राज्यात नऊ मध्यवर्ती, ३१ जिल्हा, १३ खुली आणि १७२ उपकारागृहे असून ती गृह विभागाच्या अंतर्गत येतात. या तुरुंगांत क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्याने त्यांना दाटीवाटीने राहावे लागते. त्यामुळे अनेक कैद्यांना संसर्गजन्य आजार होतात. या तुरुंगांतील कैद्यांमध्ये होणाऱ्या हाणामाऱ्या तुरुंग प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. अतिमहत्त्वाच्या कैद्यांना ठाणे, तळोजा येथील तुरुंगात ठेवण्यात येते. त्यांना वैद्यकीय चाचण्यांसाठी आणि न्यायालयात ने-आण करण्यासाठी वेळ तसेच पैसा खर्च होतो. या पार्श्‍वभूमीवर आर्थर रोड, ठाणे आणि तळोजा तुरुंगावरील भार हलका करण्याच्या दृष्टीने मुंबईत नवीन तुरुंग बांधण्याचा प्रस्ताव गृह विभागाने दोन वर्षांपूर्वी तयार केला होता.

नवीन तुरुंगासाठी गृह विभागाने पालघर येथेही जागेची चाचपणी केली; मात्र तेथे कैद्यांना नेणे आर्थिकदृष्ट्या परवडण्याजोगे नसल्याने तो विचार सोडून देण्यात आला. त्यानंतर तुरुंग विभागाने मुंबईत पाच ठिकाणी जागांची पाहणी केल्यानंतर मंडाला येथील जागा निश्‍चित करण्यात आली. ही जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे डॉ. भूषणकुमार उपाध्याय (अप्पर पोलिस महासंचालक, महानिरीक्षक कारागृह) यांनी सांगितले.   

असे असेल कारागृह
साडेतीन एकर जमिनीवर तुरुंग उभारणार
तेथे सीसी टीव्ही कॅमेरा, व्हिडीओ कॉन्फरसिंगची सुविधा असेल. 
सेन्सर बेस वॉलमुळे कैदी पळून जाऊ शकणार नाहीत. 
भिंतींवर उच्च दाब वाहून नेणाऱ्या विजेच्या तारांचे कुंपण
अतिमहत्त्वाच्या कैद्यांसाठी एक बॉम्बप्रूफ बराक बनवण्याचा विचार

Web Title: maharashtra news State-of-the-art quadrangle