मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पोस्को स्टीलकडून दोन कोटी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

मुंबई -पोस्को स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक गिल हो बॅंग यांनी बुधवारी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दोन कोटींचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी पोस्को स्टील कंपनीचे संचालक मिस्टर आन, पोस्को स्टील कंपनीचे उपमहाव्यस्थापक महेश गोखले उपस्थित होते.

दिघी हे रायगड जिल्ह्यातील मोठे बंदर आहे. या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी पोषक वातावरण आणि संसाधने उपलब्ध आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथे मोठी रिफायनरी असून, या ठिकाणी ५० एकर जमीन गुंतवणूकीसाठी उपलब्ध आहे, असेही फडणवीस म्हणाले. रायगड जिल्ह्यातील दिघी पोर्ट ट्रस्ट येथे पोस्को स्टील कंपनीसाठी एक हजार एकर जमिनीची आवश्‍यकता असून, या ठिकाणी कोरियाच्या पोस्को स्टील कंपनीमार्फत ३० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित आहे. या प्रकल्पातून रोजगार मिळेल, असे पोस्कोचे व्यवस्थापकीय संचालक बॅंग यांनी सांगितले. 

Web Title: maharashtra news Two crores from Posco Stylk for the Chief Minister fund