Maharashtra police : खाकी वर्दीमागे दडलंय संवेदनशील मन

गेली दहा वर्षे त्या पोलिस सेवेत कार्यरत असून गेल्या दीड वर्षांपासून भरोसा सेलच्या माध्यमातून त्या मोडकळीस आलेली कौटुंबिक नाती सावरण्याचे काम करत आहेत.
तेजश्री शिंदे,
सहायक पोलिस निरीक्षक
तेजश्री शिंदे, सहायक पोलिस निरीक्षकsakal

जश्री शिंदे यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतच झाले. एम.ए.साठी निवडलेल्या मराठी साहित्य या विषयात मुंबई विद्यापीठात त्या अव्वल ठरल्या. गेली दहा वर्षे त्या पोलिस सेवेत कार्यरत असून गेल्या दीड वर्षांपासून भरोसा सेलच्या माध्यमातून त्या मोडकळीस आलेली कौटुंबिक नाती सावरण्याचे काम करत आहेत.

शालेय जीवनापासूनच तेजश्री शिंदे यांचा कला, साहित्याकडे ओढा होता. महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतल्यानंतर प्राध्यापक नितीन दिंडे यांच्यामुळे त्यांना वाचनाची गोडी लागली. त्यांनी वाचलेले पहिले साहित्य म्हणजे प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे यांचे कोसला ही कादंबरी. त्याच काळात त्यांना प्रत्यक्ष नेमाडे यांच्याशी संवादही साधता आला.

त्यानंतरच साहित्यात खरी रुची निर्माण झाली व एम.ए. मराठी साहित्य या विषयात करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शिक्षण घेत असताना अनेक साहित्य संमेलनालाही त्यांनी हजेरी लावली. याचा परिपाक म्हणून त्यांच्यातील साहित्यिक हळुहळू घडत गेला.

तेजश्री शिंदे यांचा पोलिस सेवेत दाखल झाल्यानंतर साहित्याशी संपर्क काहीसा कमी झाला. मात्र साहित्याची ऊर्मी काही स्वस्थ बसू देत नव्हती. पोलिस सेवेत असताना विशेष करून भरोसा सेलमध्ये काम करताना त्यांचा अनेक महिलांशी संपर्क आला, त्यांचे दु:ख, समस्या जवळून पाहता आल्या. त्यातून स्त्री केंद्रित साहित्याचे लिखाण त्यांच्या हातून होऊ लागले. महिलांचे दु:ख त्यातून प्रतिबिंबित होऊ लागले.

समाजमाध्यमांवर लेख

तेजश्री शिंदे यांनी फेसबुक, ब्लॉगवर आजपर्यंत त्यांनी अनेक कविता तसेच विविध विषयांवरील समीक्षात्मक लेख लिहिले आहेत. त्यांच्या कवितांना नेटिझन्सकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो. त्यांची ‘वाळवण’ ही कविता तर समाजमाध्यमावर प्रचंड गाजली आहे. दिवाळी अंकातही त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.

आतापर्यंत शेकडो कविता लिहून झाल्या आहेत. त्यांचा पुस्तकरूपी कवितासंग्रह प्रसिद्ध करायचा आहे. तसेच महिलांच्या समस्यांवरही लिखाण करायचे आहे. - तेजश्री शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com