कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील बंडखोरांची घरवापसी ?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

  • महाभरतीतील बंडखोरांत गंडल्याची भावना?
  • बंडखोरांची अवस्था हाती धुपाटणं उरल्याची

राज्यात सरकार स्थापन करणार नसल्याचं भाजपनं जाहीर केल्याचा सर्वाधिक धक्का महाभरतीत भाजपमध्ये सामील झालेल्या नेत्यांनाच सर्वाधिक बसल्याची चर्चा आता रंगलीय. सर्वाधिक जागा मिळूनही भाजप विरोधी बाकांवर बसणाराय. त्यामुळे आता सत्तेच्या लालसेनं भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांवर हात चोळत बसण्याची वेळ आलीय.

यामध्ये सर्वाधिक फटका बसणाराय तो गणेश नाईक आणि कुटुंबाला. त्यांचं अख्खं कुटुंब आणि नवी मुंबई महापालिकेतील नगरसेवक मोठ्या संख्येनं भाजपमध्ये गेलेत. महत्त्वाचं मंत्रिपद मिळेल, असा गणेश नाईकांना विश्वास होता. मात्र, त्यांचं स्वप्न भंगलंय.

खासदार संजय राऊत लिलावती रुग्णालयात दाखल

माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना नगर जिल्ह्यात आधीच भाजपला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्यात आता सत्तेपासूनही वंचित झाल्यानं विखे-पाटील करणार काय, हा सवाल विचारला जातोय.

अकलूजचे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, ना त्यांना लोकसभेचं तिकीट मिळालं ना विधानसभेचं. आता तर त्यांचा विधानपरिषदेचा मार्गही बंद झालाय.

'त्या' पन्नास मिनिटांच्या बैठकीत काय ठरलं ?

काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या हर्षवर्धन पाटलांचा दणदणीत पराभव झालाय. त्यांचीही आता बिकट अवस्था झालीय.

राजहंस सिंह, रमेशसिंह ठाकूर, चित्रसेन सिंह, जयप्रकाश सिंह हे भाजपमध्ये गेलेले नेते आता भविष्याचा विचार करताना दिसताहेत.

जयदत्त क्षीरसागर, शिवेंद्रसिंहराजे भोसले, राणा जगजीतसिंह पाटील अशा अनेक नेत्यांचीही काही वेगळी अवस्था नाही. ही मंडळी काँग्रेस-राष्ट्रवादीत कायम असती तर कदाचित चित्र वेगळं असतं. मात्र, त्यांची अवस्था आता तेल गेलं तूप गेलं हाती धुपाटणं आलं, अशी झाली, असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये.

Webtitle : maharashtra politica crunch what will happen to rebel candidates now


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra politica crunch what will happen to rebel candidates now