मुंबई : विविध मागण्यांसाठी रिपब्लिकनचा मोर्चा

 Strike
StrikeSakal media

मालाड : कांदिवली (kandivali) पी उत्तर विभागाच्या हद्दीतील गोकुळनगर, दुर्गानगर, क्रांतिनगर येथील जनतेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी (civic problems) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) मुंबई प्रदेश, उत्तर भारतीय आघाडीतर्फे विभाग कार्यालयावर धडक मोर्चा (strike) काढण्यात आला.

 Strike
डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला बापाने पाजली दारू

या विभागात पाण्याच्या अनियमितपणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे पाण्याची वेळ निश्चिती करावी, विभागात घाणीचे साम्राज्य असून रोगराई पसरत आहे. त्यामुळे स्वच्छता अभियान राबवावे, धूर फवारणी करण्यात यावी, वैद्यकीय सुविधा पुरवाव्यात, अशा मागण्यांसाठी पक्षाचे शेकडो कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. कांदिवली (पू.) क्रांतिनगर या विभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली.

पी उत्तर विभाग कार्यालयावर जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी मुंबई प्रदेश अध्यक्ष हरिहर यादव यांच्या नेतृत्वाखाली उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष अशोक यादव, उत्तर पश्चिम जिल्हा सचिव शंकर गुप्ता, दिंडोशी तालुका अध्यक्ष वृंदानद शिंदे, तालुका सचिव संजय बोराडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. १० जणांच्या कमिटीने पालिकेच्या कार्यालयात जाऊन मागणीपत्र दाखल केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com