Maharashtra Politics | शिंदे निघाल्याची माहिती कंट्रोल रुमला होती, संशयाची सुई गृहमंत्र्यांकडे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCB excludes Aryan khan from chargesheet Dilip Walse Patil Action against Sameer Wankhede pimpri

शिंदे निघाल्याची माहिती कंट्रोल रुमला होती, संशयाची सुई गृहमंत्र्यांकडे?

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ माजली आहे. शिंदेंनी रातोरात्र सेनेचे नेते फोडले आणि नवा गटचं शिवसेना असल्याचा दावा केला. सध्या ५० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. भाजपशासित आसाम राज्यात शिंदेंच्या गटाला आश्रय देण्यात आलाय. यानंतर राज्यात नवं सरकार येणार असल्याची चर्चा आहे. (Maharashtra Politics)

मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार बंडाची तयारी करत असताना याची माहिती इंटेलिजन्सला पोहोचली नाही, याची शक्यता कमी आहे. सेनेत फोडाफोडी होणार. आमदार सूरतला जाणार आणि महाविकास आघाडी सरकारची कोंडी होणार, यासंबंधी संभाषणं झाली असणार. आणि त्याची कानोकान माहिती कोणत्याही पोलीस यंत्रणेला लागली कशी नाही, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. (Eknath Shinde)

दरम्यान, रातोरात एकनाथ शिंदेंसह अन्य मंत्री आणि आमदारांनी सरकारी सुरक्षा सोडली. महाराष्ट्राच्या सिमेवरच सर्वांनी सुरक्षा रक्षकांना माघारी पाठवलं. मात्र, यावेळी सुरक्षा रक्षक आणि पोलीस अधिकारी काय करत होते, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. त्यामुळे गृहखात्याला याची माहिती होती, असं समोर आलं आहे. आता संशयाची सुई वळसे पाटील यांच्याकडे गेल्याचं चित्र आहे.(Dilip Walse Patil Latest News)

हेही वाचा: एकनाथ शिंदेंचं बंड मोडण्यासाठी गृहखातं सक्रीय, वळसे पाटील वर्षावर रवाना

राजकीय मंडळी महाराष्ट्र सोडून कुठेतरी जात होती. एकाच वेळी एवढं मोठं बंड घडत होतं. याची कुणकुण सरकारी यंत्रणांना लागली कशी नाही, असा प्रश्न उपस्थित झाला. सेनेचे खासदार संजय राऊत यांनी संबंधित अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र या प्रकरणात आता महत्वाची माहिती समोर य़ेत आहे.

पोलिसांनी कंट्रोल रुमला कॉल केलं

बंडखोर नेत्याच्या सुरक्षेस असलेल्या पोलिसांवर कारवाई होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. चारही मंत्र्याच्या सुरक्षा रक्षकांनी याबाबत वाॅकीटाॅकवर माहिती दिली होती. तर एकनाथ शिंदे सुरतच्या दिशेने जात असल्याची पूर्ण माहिती 'कंट्रोल रूम'ला देण्यात आल्याचं समोर आलं आहे. शिंदे आपल्यासोबत पाच ते सहा आमदारांना घेऊन गुजरातला जात असल्याची माहिती गृहमंत्र्यांना होती, असं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे.

या घडामोडीत पोलिसांचा दोष आढळून येत नसल्याने त्यांच्यावर कारवाई होणार नसल्याची माहिती समोर येत आहे.

Web Title: Maharashtra Politics Dilip Walse Patil Eknath Shinde Leaves Security

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Dilip Walse Patil
go to top