
कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आणि भाजपमध्ये ट्विटवॉर नेहमीच सुरू असते. परंतु आता शिवरायांच्या इतिहासावरून हे ट्विटवॉर सुरू आहे.
मुंबई - भाजप आणि कॉंग्रेसमध्य़े छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून जोरदार खडाजंगी पहायला मिळत आहे. कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आणि भाजपमध्ये ट्विटवॉर नेहमीच सुरू असते. परंतु आता शिवरायांच्या इतिहासावरून हे ट्विटवॉर सुरू आहे.
कॉंग्रेसप्रवक्ते सचिन सावंत यांनी काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराजांच्या सामाजिक समरसतेबाबत तसेच धर्मनिरपेक्षतेबाबत ट्विट केले होते. त्यातील एका ट्विट मध्ये त्यांनी म्हटले होते की, 'शिवरायांच्या कन्या सकवारबाई उर्फ सखू सासरी जात असताना शत्रू सैन्याने हल्ला केला. त्यावेळी त्यांना वाचवणाऱ्या वाल्हे गावच्या महार समाजातील मंडळींना त्यांनी भोसले हे नाव दिले. गावकुसाबाहेर राहणाऱ्या महार, मांग, घोर, चांभार व रामोशी यांना शिवरायांनी मानाचे स्थान दिले.'
३. शिवरायांच्या कन्या सकवारबाई उर्फ सखू सासरी जात असताना शत्रू सैन्याने हल्ला केला. त्यावेळी त्यांना वाचवणाऱ्या वाल्हे गावच्या महार समाजातील मंडळींना त्यांनी भोसले हे नाव दिले. गावकुसाबाहेर राहणाऱ्या महार, मांग, घोर, चांभार व रामोशी यांना शिवरायांनी मानाचे स्थान दिले.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 18, 2021
सचिन सावंतांच्या या ट्विटवर आक्षेप घेत भाजपच्या अधिकृत ट्विटर हॅंडलरवरून टीका करण्यात आली. 'महाराणी सकवारबाई या शिवरायांच्या पत्नी व सखुबाई या कन्या ! मात्र सकवारबाईंना शिवरायांच्या कन्या लिहून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी अकलेचे तारे तोडले. काँग्रेसने स्वतःच्या खोट्या इतिहासाचे दाखले जरुर द्यावेत, मात्र शिवरायांच्या इतिहासात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही.'
महाराणी सकवारबाई या शिवरायांच्या पत्नी व सखुबाई या कन्या ! मात्र सकवारबाईंना शिवरायांच्या कन्या लिहून काँग्रेसचे प्रवक्ते @sachin_inc यांनी अकलेचे तारे तोडले. काँग्रेसने स्वतःच्या खोट्या इतिहासाचे दाखले जरुर द्यावेत, मात्र शिवरायांच्या इतिहासात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. pic.twitter.com/TDYAZ430Cb
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 19, 2021
भाजपच्या ट्विटवर सावंतांनी पुन्हा उत्तर दिले. आणि इतिहासाचा दाखला दिला. सावंत या ट्विटमध्ये म्हणतात की, 'भाजपाचा तोंड फोडणारा पुरावा हा प हा! सकवारबाई या महाराजांच्या कन्या होत्या व एका पत्नीचे नाव ही तेच होते. भाजपाने शिवरायांचा अवमान केला. माझी बदनामी केली. अकलेचे तारे तोडल्याबद्दल भाजपने तात्काळ माफी मागावी. शिवरायांच्या इतिहासात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत''
भाजपाचा तोंड फोडणारा पुरावा हा पहा! सकवारबाई या महाराजांच्या कन्या होत्या व एका पत्नीचे नाव ही तेच होते. भाजपाने शिवरायांचा अवमान केला. माझी बदनामी केली. अकलेचे तारे तोडल्याबद्दल @BJP4Maharashtra ने तात्काळ माफी मागावी. शिवरायांच्या इतिहासात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत https://t.co/Nlh6YFZAa2 pic.twitter.com/sEUgG1ah3I
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 22, 2021
----------------------------------------
maharashtra politics marathi updates bjp against sachin sawant shivaji maharaj daughter history