MPSC परीक्षा पुढे ढकलण्याबाबत सरकार सकारात्मक, विनायक मेटेंची माहिती

सुमित बागुल
Thursday, 8 October 2020

मराठा आरक्षण आणि MPSC परीक्षांबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली

मुंबई : मराठा आरक्षण आणि MPSC परीक्षांबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. काही मराठा नेत्यांची MPSC परीक्षा रद्द करू नये अशी मागणी आहे. तर काहींची आरक्षण मिळाल्याशिवाय MPSC च्या परीक्षा घेऊच नये अशी मागणी आहे. या बैठकीत वेगवेगळे मतप्रवाह आहेत आणि त्यावर चर्चा होणार असल्याचं अजित पवार यांनी बैठकीआधीच म्हटल होतं. दरम्यान सह्याद्री अतिथीगृहावर उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीचा पहिला टप्पा पार पडला. या बैठकीनंतर शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी माध्यमांना बैठकीच्या पहिल्या टप्प्याबाबत माहिती दिली.

सर्वात मोठी बातमी : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात CBI करणार नव्याने तपास, दुसरं पथक मुंबईत दाखल

MPSC परीक्षांबाबत काय म्हणालेत विनायक मेटे ?

येत्या ११ तारखेला MPSC च्या परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलाय. मात्र मराठा समाजाचा या परीक्षांना नकार आहे. विनायक मेटे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीप्रमाणे आज सरकारसोबत तब्बल २० विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली . मुख्यत्वे होऊ घातलेल्या MPSC परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. त्यावर सरकारकडून काही तांत्रिक बाबी सांगितल्या गेल्यात, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि मराठा आरक्षणाच्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर होऊ घातलेली परीक्षा पुढे ढकलण्याची  मागणी आम्ही लावून धरली. अशात येत्या ११ तारखेला होऊ घातलेल्या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं आम्हाला वाटतंय असं विनायक मेटे म्हणालेत. 

मोठी बातमी : फेक TRP स्कॅम : अर्णब गोस्वामी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना कोर्टात खेचणार

MPSC परीक्षा पुढे ढकलल्याने ज्या विद्यार्थ्यांची वयाची मर्यादा संपुष्टात येतेय अशाना वयोमर्यादा वाढवून देण्याचीही मागणी करण्यात आलीये. दरम्यान, याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. परीक्षा ११ तारखेला असल्याने जर त्या पुढे ढकलायच्या झाल्यास तो निर्णय आजच घ्यावा लागेल. अशात आज रात्रीपर्यंत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय होऊ शकतो असं विनायक मेटे म्हणालेत. 

आज, परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला नाही तर मात्र पुढील कारवाई काय करायची हा नंतर विचार केला जाईल असंही विनायक मेटे म्हणालेत.

maharashtra state government seems positive for postponing MPSC election scheduled on 11th October  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra state government seems positive for postponing MPSC election scheduled on 11th October