अॅसिड हल्ल्यातील 15 जखमींना मिळाली नोकरी

हर्षदा परब
शनिवार, 18 मार्च 2017

अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या 15 जणांना नोकरीसाठीचे नेमणुक पत्र आज राज्य महिला आयोगामार्फत वितरीत करण्यात आले. येत्या 1 एप्रिलपासून हे पंधरा जण कामाच्या ठिकाणी रूजु होणार आहेत

मुंबई: अॅसिड हल्ल्यानंतर दिवसागणिक मरण यातना सहन करणाऱ्या अॅसिड जखमींना आजचा दिवस काहीसा दिलासा देणारा ठरला आहे. अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या 15 जणांना नोकरीसाठीचे नेमणुक पत्र आज राज्य महिला आयोगामार्फत वितरीत करण्यात आले. येत्या 1 एप्रिलपासून हे पंधरा जण कामाच्या ठिकाणी रूजु होणार आहेत.

नुकत्याच महिला दिनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात अॅसिड सर्व्हायव्हर्सना नोकरी देण्याच आश्वासन देण्यात आल होतं. त्यानुसार आज हे सगळे आयोगाला नोकरीच काय झाल याची विचारणा करण्यासाठी आले होते. पंधरा जणांना नोकरीचं नेमणुक पत्र देणार याबाबत माहिती कळताच सगळ्यांचा आनंद द्विगुणित झाला. इतक्या चटकन नोकरी मिळेल अस अनेकांच्या ध्यानीमनीही नव्हतं. आयोगाच्या तत्काळ मदतीमुळे सगळ्या अॅसिड सर्व्हायव्हर्सना एक मोठा दिलासा आज मिळाला. 

आयोगाने महिला दिनाच्या कार्यक्रमात घोषणा केलेल्या 16 लाख रूपयांच्या वितरणाबाबतची माहितीही आज जाहीर केली.पन्नास हजार रूपये अॅसिड सर्व्हायव्हरच्या बँक खात्यात तर पन्नास हजार रूपये पोस्टात एफडी करण्यात येणार आहेत. 16 अॅसिड सर्व्हायव्हर्सना प्रत्येकी एक लाख रूपयांची मदत मिळणार आहे. आयोगाकडून दर तिसऱ्या शनिवारी या अॅसिड सर्व्हायव्हर्सचे समुपदेशन करण्यात येते. राज्य महिला आयोगाने या सर्व्हायव्हर्सच्या मुलांच्या शिक्षणाचीही जबाबदारी घेतली आहे. आज मराठी अभिनेत्री अमृता सुभाषनेही या अॅसिड सर्व्हायव्हर्सना भेट देऊन मार्गदर्शन केले.

Web Title: maharashtra state women's commission gave job to 15 acid victims