महाराष्ट्रातील मतमोजणीसाठी 25 हजार कर्मचारी सज्ज; जाणून घ्या कशी होते मतमोजणी?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

 • मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण
 • पंचवीस हजारावर कर्मचाऱ्यांची मनमोजणीसाठी नियुक्ती

मुंबई : राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या दि. 24 रोजी होणाऱ्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी  पंचवीस हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली.

 

कशी पार पडेल मतमोजणी ? 

 • सकाळी 8 वाजता सुरू होईल मतमोजणी 
 • 269 ठिकाणी 288 मतदारसंघांची मतमोजणी होणार आहे. 
 • मतदार संघातील 5 बूथच्या VVPAT मधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाते.
 • हे पाच बूथ चिठ्ठी टाकून उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि निरीक्षक यांच्या उपस्थितीत निवडले जातात.
 • VVPAT मधील चिट्ठीतील मते आणि आणि ईव्हीएम वरील मतांची पडताळणी यावेळी केली जाते.
 • सुरवातीला पोस्टल मतांची मतमोजणी केली जाते.
 • पोस्टल मतं आणि बरकोडद्वारे ETPB (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट) मोजले जातील. 
 • प्रत्येक टेबलला मतमोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात.
 • प्रत्येक फेरीनंतर  निकलची आकडेवारी जाहीर करण्यात येते. 

कोणत्या वेबसाइटवर पाहता येईल निकाल ? 

भारत निवडणूक आयोगाच्या results.eci.gov.in या संकेतस्थळावर तसेच 'Voter Helpline' या गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध असलेल्या अँड्रॉइड ऍपवर मतदारसंघाचे फेरीनिहाय निकाल, संपूर्ण राज्यातील पक्षनिहाय आघाडीवरील उमेदवार, विजयी उमेदवार, पक्षनिहाय मतदानाची टक्केवारी आदी माहितीदेखील उपलब्ध होणार आहे.

WebTitle : maharashtra vidhansabh how voting is counted and how results come


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra vidhansabh how voting is counted and how results come