Vidhan Sabha 2019 : कल्याण पूर्व : शिवसेनेतील बंडखोरीचे महायुतीसमोर आव्हान!

Ganpat-and-Dhananjay
Ganpat-and-Dhananjay

विधानसभा 2019 : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो; मात्र २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे पुंडलिक म्हात्रे यांच्यावर अपक्ष उमेदवार गणपत गायकवाड यांनी मात केली. २०१४ च्या ‘मोदी लाटे’तही गायकवाड यांनी भाजपसह शिवसेनेला पराभवाची धूळ चारली. आता गायकवाडच महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर रिंगणात १९ उमेदवार आहेत; मात्र त्यांची खरी लढत अपक्ष उमेदवार धनंजय बोडारे यांच्याशी होईल. बोडारे हे उल्हासनगरमधील शिवसेनेचे मोठे प्रस्थ; मात्र ही जागा भाजपला सोडल्याने नाराज झालेले बोडारे बंडखोरी करत अपक्ष रिंगणात उतरलेत. त्यामुळे या लढतीकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

गणपत गायकवाड 
बलस्थाने

    महिला बचत गटांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती. 
    सिमेंट रस्त्यांसाठी निधी दिला.
    शास्ती कर कमी करून आणल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा.
    कल्याण पूर्वेतील विकासासाठी कोट्यवधींचा निधी.

कमजोरी
    महापालिका प्रशासनावर अंकुश ठेवण्यात नगरसेवक अपयशी.
    नालेसफाई, दूषित पाणीपुरवठा आदी मुद्द्यांवर नाराजी.
    दोन वेळा भाजपविरोधी लढतीने मतदार मानणार का, हा प्रश्‍न.

धनंजय बोडारे
बलस्थाने

    शिवसेनेतील उल्हासनगरमधील मोठे नाव. 
    उच्चशिक्षित असल्याने प्रभाव.
    शिव रोजगार योजना, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे पालकत्व. 
    कामगारांना न्याय देण्यासाठी संघटनेची स्थापना. 

कमजोरी
    महायुतीच्या विरोधात शिवसेनेतील बंडखोर म्हणून रिंगणात.
    उल्हासनगरमधील उमेदवार असल्याने अन्य भागात नापसंतीची शक्‍यता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com