Vidhan Sabha 2019 : नालासोपारा : ‘चकमक फेम’शी युवा नेत्याची टक्कर

संदीप पंडित
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

पालघर जिल्ह्यातील नालासोपारा मतदारसंघात ‘चकमक फेम’ माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा शिवसेनेकडून युतीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेत. त्यांना बहुजन विकास आघाडीचे (बविआ) युवा नेते क्षितिज ठाकूर टक्कर देत आहेत. मतदारसंघ भाजपचा असतानाही शिवसेनेने दावा करीत तो पदरात पाडून घेतला आणि मतदारसंघाबाहेरच्या शर्मांना उमेदवारी दिली.

विधानसभा 2019 : पालघर जिल्ह्यातील नालासोपारा मतदारसंघात ‘चकमक फेम’ माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा शिवसेनेकडून युतीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेत. त्यांना बहुजन विकास आघाडीचे (बविआ) युवा नेते क्षितिज ठाकूर टक्कर देत आहेत. मतदारसंघ भाजपचा असतानाही शिवसेनेने दावा करीत तो पदरात पाडून घेतला आणि मतदारसंघाबाहेरच्या शर्मांना उमेदवारी दिली. त्यामुळे युती असूनही भाजपमध्ये अंतर्गत नाराजी आहे. मतदारसंघाच्या अस्तित्वापासून येथे ठाकूर यांची पकड आहे. मात्र, ‘बविआ’च्या बालेकिल्ल्यात शर्मा उतरल्याने येथील लढतीकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

क्षितिज ठाकूर 
बलस्थाने

    सलग दोनदा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व.
    महापालिकेत सत्ता; सर्वाधिक नगरसेवक असल्याचा फायदा.
    उच्चशिक्षित, विकासाचे व्हिजन असलेला युवक नेता म्हणून परिचित.

उणिवा
    मतदारसंघात पावसाळ्यात तुंबणारे पाणी.
    मतदारसंघातील बेकायदा बांधकामांचा प्रश्‍न.

प्रदीप शर्मा
बलस्थाने

    ‘चकमक फेम’ पोलिस अधिकारी म्हणून ओळख.
    प्रथमच राजकीय आखाड्यात उतरलेला चेहरा.
    शिवसेनेतील बड्या नेत्यांचे पाठबळ.
    उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा.

उणिवा
    नवा चेहरा असल्याने कोणतेही विकासकाम नाही.
    स्वतःच्याच नेत्यांना अडचणीत आणणारी वक्तव्ये.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 nalasopara politics