Vidhan Sabha 2019 : शिवसेनेच्या अस्तित्वाला मनसेचा आव्हानाचा प्रयत्न

शर्मिला वाळुंज
Tuesday, 15 October 2019

कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेचे रमेश म्हात्रे आणि मनसेचे प्रमोद (राजू) पाटील यांच्यात लढत असून, कोण किती मताधिक्‍य मिळवते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. ग्रामीण भागात शिवसेनेचे संघटन वाढले आहे. म्हात्रेंचा जनसंपर्क दांडगा आहे. २००९ चा अपवाद वगळता येथून शिवसेनेचेच आमदार आणि खासदार झालेले आहेत.

विधानसभा 2019 : कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेचे रमेश म्हात्रे आणि मनसेचे प्रमोद (राजू) पाटील यांच्यात लढत असून, कोण किती मताधिक्‍य मिळवते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. ग्रामीण भागात शिवसेनेचे संघटन वाढले आहे. म्हात्रेंचा जनसंपर्क दांडगा आहे. २००९ चा अपवाद वगळता येथून शिवसेनेचेच आमदार आणि खासदार झालेले आहेत. राजू पाटील हेही स्थानिकच असले, तरी २०१४ मधील पराभवानंतर मनसेची मतदारसंघावरील पकड कमी होत गेली. आगरी समाजाचे वर्चस्व येथे असले, तरी काही वर्षांत परप्रांतीयांची संख्याही झपाट्याने वाढली. ही मते आपल्या पारड्यात पाडण्यासाठी उमेदवारांचे प्रयत्न आहेत.

रमेश म्हात्रे
बलस्थाने

    शिवसेनेचे मजबूत संघटन, गावोगावी शाखा.
    महापालिकेत शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या अधिक.
    ग्रामीण भागात संपर्क.
    महापालिकेत विविध पदांवरील कामाचा अनुभव.

कमजोरी
    शिवसेनेतील अंतर्गत नाराजी.
    ग्रामीण भागात राहत नसल्याने एक गट नाराज.
    ग्रामीण भागांतील पाणी, रस्ते, प्रदूषणाच्या समस्या सोडविण्यात शिवसेनेला अपयश

प्रमोद पाटील
बलस्थाने

    स्थानिक भूमिपुत्र म्हणून पाठिंबा.
    मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची खास मर्जी.
    कामगारनेते स्व. रतन पाटील यांचे पुत्र ही जमेची बाजू.
    क्रिकेट स्पर्धांच्या आयोजनांमुळे तरुणांमध्ये परिचयाचा चेहरा.

कमजोरी
    परदेशी वास्तव्यामुळे स्थानिकांशी संपर्क कमी.
    मतदारसंघात पाच वर्षांत मनसेचे एकही कार्य नाही.
    गटबाजीच्या फटक्‍याची शक्‍यता. ग्रामीण भागात संघटन नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 Shivsena mns politics