Vidhan Sabha 2019 : मतदान करणाऱ्यांना ‘मेंटेनन्स’मध्ये सूट!

मुंबई - धीरज एनक्‍लेव्ह सोसायटीचा उपक्रम.
मुंबई - धीरज एनक्‍लेव्ह सोसायटीचा उपक्रम.

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी अधिकाधिक मतदान व्हावे, याकरिता सरकारतर्फे जनजागृती केली जात असताना खासगी संस्थांनीही आपापल्या परीने यात सहभाग घेतला आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कांदिवलीतील ‘धीरज एन्क्‍लेव्ह’ सोसायटीने मतदान करणाऱ्या सदस्यांना ‘मेंटेनन्स’मध्ये २०० रुपयांची सूट देण्यासह दिवाळीसाठी मातीचे दिवे भेट देण्याचे जाहीर केले आहे. 

‘आमदार मतदारसंघात फिरकला नाही, आमच्या समस्या सोडविल्या नाहीत,’ असे म्हणत अनेक जण लोकप्रतिनिधींच्या नावाने बोटे मोडतात; तर काही जण थेट मतदानावर बहिष्कार टाकतात. असे असले तरी अनेक जण आपापल्या परीने मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती करतात. असाच उपक्रम राबविण्याचा निर्णय कांदिवलीतील ‘धीरज एन्क्‍लेव्ह’ सोसायटीने घेतला आहे.

मतदान करणाऱ्या सदस्यांना मासिक मेंटेनन्समध्ये २०० रुपयांची सूट सोसायटीकडून दिली जाणार आहे. ही सूट वर्षभर मिळणार आहे. शिवाय, सदस्यांना दिवाळीसाठी दिवेही भेट देण्यात येणार आहेत. तशी पत्रकेही सोसायटीने वितरित केली आहेत. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि लहान मुलांनी ती घरोघरी वाटली. या सोसायटीत १५४ सदनिका असून, समितीने सोसायटीतील सदस्यांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्थाही केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com