सरकार कधी पडणार याचे मुहूर्त बघण्यात विरोधकांचा वेळ गेला : मुख्यमंत्री ठाकरे

सरकार कधी पडणार याचे मुहूर्त बघण्यात विरोधकांचा वेळ गेला : मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई,ता.14: तीन पक्षाच्या महाविकास आघाडीचे सरकार कोरोना महामारीचा सामना करत असताना हे  सरकार कधी पडणार यांचे मुहूर्त बघण्यात विरोधकांचा वेळ गेला. अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाने बोलावलेल्या चहापानानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरोना साथीमुळे हे अधिवेशन दोन दिवसांत उरकले जाणार आहे. यामधे शोकप्रस्ताव, पुरवणी मागण्या आणी अध्यादेश व काही विधेयके असे मर्यादित कामकाज केले जाणार आहे. 

यावेळी झालेल्य पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहव मंत्री अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह आणखी काही नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आमचे सरकार कोरोनाशी सामना करीत होते तर विरोधक हे सरकार कधी पडतय याचा मुहूर्त शोधत होते. 

भाजपाचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी असल्याची टीका पत्रकार परिषदेत  केली आहे. तो धागापकडून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की महाराष्ट्रात जर अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का? जर राज्यात अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का? शेतकरी दिल्लीच्या सीमेवर त्यांच्या न्याय हक्कासाठी ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्याशी नीट बोलणे, त्यांच्या भावना समजून घेणे, या गोष्टी तर सोडाच पण भर थंडीत शेतकऱ्यांना उघड्यावर बसावे लागत आहे. त्यांच्यावर थंडगार पाण्याचे फवारे मारले जात आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

यानंतर ते पुढे म्हणाले की, आंदोलन करणारे शेतकरी हे डावे आहेत, अतिरेकी आहेत, पाकिस्तानी-चिनी आहेत की आणखी कुठून आले आहेत हे सर्व  एकदा ठरवावे. आपल्याच अन्नदात्यावर अन्याय करताना त्याला तुम्ही देशद्रोही आणि अतिरेकी ठरवणे हे आपल्या संस्कृतीत बसत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

याचबरोबर, कोरोना काळात महाराष्ट्रात प्रचंड भ्रष्टाचार झाला हा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या आरोपाला उत्तर देत असताना उद्धव ठाकरे म्हणाले,  कोरोना काळात जे काही घडलं त्यातून आपण मार्ग काढत आहोत. मात्र विरोधकांनी या सगळ्या काळातही फक्त राजकारण केले. कोरोनाच्या काळात राज्य सरकारच्या तिजोरीवर भर पडला आहे. अजूनही केंद्राकडून राज्याचे 28 हजार कोटी येणे बाकी आहे, याचा उल्लेखदेखील त्यांनी केला.

सरकारने कोणती कामे केली आहेत, हे विरोधकांनी पाहिलेच नसेल. सरकारने मागील वर्षभरात कायकाय  कामे केलीत याची पुस्तिका नुकतीच महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवली आहे. जनतेत कुठेही सरकारबद्दल नाराजी किंवा असमाधान असल्याचा सूर नाही. विरोधी पक्षांच्या नावातच विरोधी आहे. त्यामुळे त्यांना विरोधी या शब्दाला जागावे लागते. ते जे काही म्हणताय ते त्यांच्यापुरते बरोबर आहे, असे उद्धव  ठाकरे म्हणाले.


उपमुख्यमांत्री अजित पवारही यावेळी म्हणाले की, महाविकास आघाडीला विधान परिषद निवडणुकीत जनतेचा कौल मिळाला. जनता विरोधात असती तर निकाल असे लागले नसते,' असा टोला अजित पवार यांनी विरोधकांना लगावला.

ठळक मुद्दे :

  • केंद्र सरकारने जीएसटीचा निधी अद्याप दिला नाही. कोरोना संकट, निसर्ग चक्रीवादळ सारखी संकटं आली  पण केंद्राकडून मदत नाही.
  • मराठा आरक्षण चर्चा सुरू,न्यालियलिय बाजू मांडली जात आहे.
  • ओबीसी समाजात गैरसमज पसरविण्याचे काम काहीजण करत आहेत. ओबीसी आरक्षण कमी होणार नाही.
  • सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम विरोधी पक्षाने करू नये.
  • ओबीसी समाजाला डिवचण्याचे काम केले जात आहे.
  • पाकिस्तानातून कांदा साखर तुम्ही आणली आणि आता शेतकऱ्यांना पाकिस्तानी ठरवता?

( संपादन - सुमित बागुल )

maharashtra winter session 2020 speech of VM uddhav thackeray before assembly session

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com