धनगर समाजाच्या आरक्षणावरुन विधिमंडळ परिसरात‘महाराष्ट्र यशवंत सेने’चं आंदोलन

धनगर समाजाच्या आरक्षणावरुन विधिमंडळ परिसरात‘महाराष्ट्र यशवंत सेने’चं आंदोलन

मुंबई : धनगर समाजाच्या आरक्षणावरुन महाराष्ट्र यशवंत सेना आक्रमक झाली असून, महाराष्ट्र यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी विधिमंडळात आज घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी महाराष्ट्र यशवंत सैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे विधानभवन परिसर दुमदुमला होता.

पुरंदरच्या बहिणीला न्याय मिळावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या प्रमुख मागणींसह अर्थसंकल्पातील गाजर नको, धनगर समाजाच्या हक्काच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करा, या मागणीला घेऊन महाराष्ट्र यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांचे विधानभवन येथे तीव्र आंदोलन केले. फक्त आश्वासन देणाऱ्या सरकारचा महाराष्ट्र यशवंत सेनेने निषेध केला. दरम्यान, पुरंदर घटनेतील आरोपीकडे प्रशासन आणि राज्य सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. त्याविरोधात महाराष्ट्र यशवंत सेनेच्या सैनिकांनी विधान भवन परिसरात समाजावरील अन्यायाविरुद्ध रोष व्यक्त केला.

विधानभवनात घुसणाऱ्या मुंबई प्रमुख धनाजी धायगुडे, आदिनाथ पाटील,बाळासाहेब खांडेकर,राजेश कोळेकर,अमर इंगळे,मोहन महारनुर,दिनेश सोलनकर,आकाश गुरचळ,प्रकाश गुरचळ,दीपक नरुटे,समाधान इरकर,कृष्णा गडदे,शिवाजी ठोंबरे,आकाश खोत या महाराष्ट्र यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com