Maratha Kranti Morcha डोंबिवलीत ठिय्या आंदोलनाला सुरवात

संजीत वायंगणकर
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

डोंबिवली : डोंबिवलीत गुरुवारी सकल मराठा समाजातर्फे ठिय्या धरणे आंदोलनाला सुरवात झाली. डोंबिवलीमध्ये कोणत्याही प्रकारचा बंद नसल्याची मराठा क्रांती मोर्चा पदाधिकारी यांनी माहिती दिली.

पूर्वेतील इंदिरा गांधी चौकात मंडप व्यासपीठावर त्यासमोर रस्त्यावर सर्व पक्षीय मराठा समाजातील पदाधिकारी ,नगरसेवक , नगरसेविका महिला आदी येथे जमू लागले आहेत. आंदोलनात सहभागी होत आहेत, मराठा समाजाला हक्काचे आरक्षण तातडीने द्यावे यासाठी ठिय्या दिलेल्या आंदोलकांकडून जोरदार घोषणा देण्यात येत आहेत.

डोंबिवलीत बंद नसलातरी शाळा, कॉलेज संमिश्र सुरु आहेत. रिक्षा व परिवहन बससेवा शहरात सुरळीत सुरु आहे. रेल्वे स्टेशन परिसरात पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. 

Web Title: #MaharashtraBandh Dombivli Agitation is Started