शंकरराव गडाख यांनी बांधलं शिवबंधन, मातोश्रीवर पार पडला शिवसेना पक्षप्रवेश

सुमित बागुल
Tuesday, 11 August 2020

शिवसेना पक्षप्रमुख  आणि  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शंकरराव गडाख यांनी  हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

मुंबई : मुंबईतून एक मोठी राजकीय अपडेट समोर येतेय. महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री त्याचबरोबर उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेना पक्षप्रमुख  आणि  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शंकरराव गडाख यांनी  हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे देखील उपस्थित होते. 

हेही वाचा :  राजस्थानातील राजकीय भूकंपावर मुंबईतून रेस्क्यू ऑपरेशन, पायलटच्या घरवापसीचं मुंबई कनेक्शन

शिवसेनेकडून याबाबत अधिकृत ट्विट  करत माहिती देण्यात आली आहे.  दरम्यान गडाख यांना शिवसेनेत आणण्यात शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची मुख्य भूमिका राहिलीये. २०१९ विधानसभा निवडणुकांमध्ये अहमदनगरमधील नेवासा विधानसभा मतदारसंघातून क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार असलेले शंकरराव गडाख हे अपक्ष म्हणून निवडून आलेले. निवडून आल्यानंतर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. 

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, उद्योग व्यवसाय, बेरोजगार तरुण तसेच समाजातील विविध घटकासाठी चांगले निर्णय घेतले असून राज्यवरील कोरोनाच्या संकट काळात मोठ्या हिमतीने त्यांनी आपले कार्य चालू ठेवले आहे. माझ्या वडिलांचा व हिंदू ह्र्दय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्नेहाचे संबंध होते.

गेल्या 10 वर्षात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या बरोबर अनेकदा संबंध आला. म्हणून मी आज शिवसेना पक्षात प्रवेश करत असून त्यांनी माझ्यावर मोठा विश्वास टाकत मंत्रिपदाची संधी दिली, त्या विश्वासाला पात्र राहून सर्व सामान्य जनतेसाठी काम करणार आहे आणि शिवसेना वाढिसाठी झटणार आहे. 

शिवसेना हा पक्ष शेतकरी , कष्टकरी तसेच सर्व सामान्य जनता यांच्या बरोबर असून शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग यात पक्षाचे मोठे काम आहे  असं मंत्री शंकरराव गडाख म्हणालेत

Maharashtras Minister of Soil and Water Conservation shankarrao gadakh jpins shivsena

 
  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtras Minister of Soil and Water Conservation shankarrao gadakh jpins shivsena