महात्मा फुले व सावित्रीबाईंचे पुणे विद्यापीठात स्मारक

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 एप्रिल 2018

मुंबई - स्त्रिया आणि शूद्रांना अक्षरओळख करून देऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपले आयुष्य वेचणारे महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुणे विद्यापीठाच्या परिसरात स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकासाठी जुलै 2018 च्या पुरवणी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाणार आहे.

फुले यांचे वंशज नीता होले आणि स्मारक समितीच्या सदस्यांच्या एका शिष्टमंडळाने वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मंगळवारी "सह्याद्री' अतिथिगृहावर भेट घेतली. या भेटीत समितीने विद्यापीठाच्या परिसरात फुलेंचे स्मारक उभारण्याची मागणी केली. या मागणीला प्रतिसाद देत मुनगंटीवार यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली. स्मारकाच्या कामासाठी निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही वित्तमंत्र्यांनी दिली.

राज्य सरकारने पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नावे दिले आहे. विद्यापीठाच्या नामांतरानंतर विद्यापीठात फुले दांपत्याचे स्मारक उभारण्याची मागणी पुढे येत आहे.

Web Title: mahatma phule savitribai phule Monument in pune university