महाविकास आघाडी मुंबईतील 'हयात'मध्ये करणार 'हा' अनोखा कार्यक्रम..

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 November 2019

महाराष्ट्रातील सत्ताबाजाराच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची अशी घडामोड आज हॉटेल हयातमध्ये संपूर्ण  महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे.  सत्तास्थापनेसाठी महाविकास आघाडीच्या गोटात खलबत पाहायला मिळतायत. अशातच आता यासंबंधीच्या हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून आता आपलं संख्याबळ दाखवण्यासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. थोड्याच वेळापूर्वी संजय राऊत यांनी याबद्दल ट्विटर वरून  माहिती दिलीये 

यामध्ये महाविकास आघाडी आणि अन्य अपक्ष अशा 162 आमदारांचं फोटोसेशन करण्यात येणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्रित येत हे शक्तिप्रदर्शन करणार आहेत. थोड्याच वेळात तीनही पक्षांचे आमदार आणि समर्थक पक्ष आणि अपक्ष आमदारही हयात हॉटेलमध्ये उपस्थित रहाणार आहेत.  

यामध्ये 162 आमदारांच्या एकत्रित फोटोसेशनसह ओळख परेड होणार आहे. सांताक्रूझ येथील ग्रँड हयात हाँटेल मधील मुख्य हाँल मध्ये संध्याकाळी ७ वाजता हे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.  दरम्यान आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे स्वतः मुंबईतील हयातमध्ये रवाना झालेत. याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे थोड्याच वेळात ग्रँड हयात हाँटेलमध्ये येणार आहेत.

त्यामुळे आज संध्याकाळी  हयातमध्ये काय घडतं? सर्व 162 आमदार या परेडमध्ये दिसतात का ?  हे पाहणं महत्त्वाचं आहे  

Webtitle : mahavikas aaghadi to conduct joint photo session at grand hayat : 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahavikas aaghadi to conduct joint photo session at grand hayat