सत्तास्थापनेच्या दृष्टीने महाविकास आघाडीमध्ये घडामोडींना वेग आलाय . शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांची ट्रायडंटमध्ये बैठक पार पडली. यामध्ये महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदासाठीच्या नेतानिवडीची प्रक्रिया पार पडली.
यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यानी महाराष्ट्र विकास आघाडीसमोर शरद पवारांच्या निर्देशानुसार उद्धव ठाकरे यांच्या नावाचा नेता पदासाठीचा ठराव मांडला.

याला कॉंग्रेसचे बाळासाहेब थोराथ यांनी सर्वांच्या वतीने अनुमोदन दिलं. यानंतर उपस्थित सर्वांनी हात वर करून उद्धव ठाकरे यांच्या नावाला अनुमोदन दिलं. त्यामुळे आता महाराष्ट्रात 'ठाकरे' सरकार हेणार हे आता निश्चित झालंय. 1 डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित येत बैठक घेतली. यामध्ये अधिकृत आघाडीचा ठराव देखील मांडला गेला. एकनाथ शिंदे यांनी 'महाराष्ट्र विकास आघाडी'चा नावाचा ठराव मांडला. याला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने अनुमोदन दिलं. याचसोबत अनुमोदन देताना महाराष्ट्रात शिवरायांच्या स्वप्नातील राज्य येईल असा विश्वास नवाब मलिक यांनी बोलून दाखवलं. महाराष्ट्र विकास आघाडीच्याच्या प्रस्तावाला शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि अपक्ष उमेदवार बच्चू कडू यांनी अनुमोदन दिलं
Mumbai: Shiv Sena leader Eknath Shinde moves resolution to form 'Maha Vikas Aghadi', the alliance of Shiv Sena-NCP-Congress. NCP's Nawab Malik & Congress' Nitin Raut second it. #Maharashtra https://t.co/RKcB4077W9
— ANI (@ANI) November 26, 2019
महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे उद्देशिका देखील बनवण्यात आली आहे. यामध्ये शेतकरी आणि सामान्य नागरिक यांचे मुद्दे प्रमुख स्थानी आहेत.
WebTitle : mahavikas aaghadi elects uddhav thackeray as leader of the alliance