उद्याच होणार 'ठाकरे' सरकारची अग्निपरीक्षा..

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 November 2019

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. त्यानंतर लगेचच उद्धव ठाकरे यांनी आपल्या कामाचा धडाका लावलेला पाहायला मिळतोय. यामध्ये शेतकऱ्यांसाठी देण्यात येणारी कर्जमाफी बद्दल मागवलेला अहवाल आहे, रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी मंजूर केलेले 20 कोटी रुपये आहेत किंवा आज आरे कारशेडला दिलेल्या स्थगितीचा निर्णय असेल. अशात आता एकंदरच ठाकरे सरकारसाठी आणि एकूणच महाविकास आघाडीसाठी उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. 

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांनी ३ डिसेंबर पर्यंत बहुमत सिद्ध करायला सांगितलं आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या विधानसभेत ठाकरे सरकार आपलं बहुमत सिद्ध करणार आहे.  महाराष्ट्र विधीमंडळातर्फे या संदर्भातील परिपत्रक काढून माहिती देण्यात आली आहे. 

No photo description available.

उद्या विधानसभेत काय काय होणार : 

उद्या दुपारी दोन वाजता विधानसभेचं कामकाज सुरु होणार आहे. यामध्ये राज्यपालांनी आज दिलीप वळसे पाटील यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे याबद्दलची घोषणा करण्यात येईल. या घोषणेनंतर मंत्र्यांचा परिचय करण्यात येईल. मंत्र्यांचा परिचय झाल्यावर बहुमत चाचणी पार पडणार आहे. 

No photo description available.

यानंतर रविवारी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक करण्यात येणार आहे. अध्यक्षांच्या निवडणुकीनंतर राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवली जाईल. यानंतर अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव घेण्यात येईल.आणि यानंतर विरोधी पक्ष नेत्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात येणार आहे. 

कसा असेल आकड्याच्या खेळ ? 

  • २८८ सदस्यसंख्य असलेल्या विधानसभेत बहुमत चाचणीसाठी मॅजिक फिगर आहे १४५
  • विधानसभेत शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ आणि काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. यांचं संख्याबळ १५४ होतं.
  • ८ अपक्षही शिवसेनेसोबत आहेत.
  • मात्र बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष, समाजवादी पक्ष यांचे प्रत्येकी दोन आमदार ठाकरे सरकारसोबत आहेत
  • हिंतेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीनं महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केलाय. त्यांचेही ३ आमदार या सरकारसोबत आहेत. 
  • याव्यतिरिक्त जनसुराज्य पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा एक आमदारही सरकारसोबतच आहे.
  • महाविकास आघाडीकडे १७० वर संख्याबळ आहे. 

WebTitle : mahavikas aaghadi to face floor test tomorrow afternoon at two pm

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahavikas aaghadi to face floor test tomorrow afternoon at two pm