उद्या ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा, सरकारला घेरण्यासाठी फडणवीस सक्रीय?

उद्या ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा,  सरकारला घेरण्यासाठी फडणवीस सक्रीय?

मोठ्या राजकीय नाट्यानंतर राज्यात ठाकरे सरकार विराजमान झालंय. मात्र अवघ्या काही तासात उद्धव ठाकरेंना अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. शनिवारीच महाराष्ट्र विकास आघाडीची विधानसभेत बहुमत चाचणी आहे.

२८८ सदस्यसंख्य असलेल्या विधानसभेत बहुमत चाचणीसाठी मॅजिक फिगर आहे १४५. विधानसभेत शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ आणि काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. यांचं संख्याबळ १५४ होतं. ८ अपक्षही शिवसेनेसोबत आहेत. मात्र बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष, समाजवादी पक्ष यांचे प्रत्येकी दोन आमदार ठाकरे सरकारसोबत आहेत. हिंतेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीनं महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केलाय. त्यांचेही ३ आमदार या सरकारसोबत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचं संख्याबळ 170 वर गेलंय.  

याव्यतिरिक्त जनसुराज्य पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा एक आमदारही सरकारसोबतच आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एमआयएमचे आमदार तटस्थ राहतील. त्यामुळे बहुमाताचा जादुई आकडा गाठणं महाराष्ट्र विकास आघाडीसाठी सहज शक्य आहे.

भाजप विरोधी पक्ष म्हणून काम करणार असल्याचं स्पष्ट झाल्यानं घोडेबाजाराचा धोका टळलाय. त्यामुळे ठाकरे सरकार बहुमत सिद्ध करेल यात शंका नाही. पण सरकार स्थापन झाल्यानंतर ठाकरे सरकारची राजकीय कोंडी करण्याची एकही संधी भाजप सोडणार नाही हे निश्चित. हिवाळी अधिवेशनात महाविकासआघाडी विरुद्ध फडणवीस असा सामना रंगणार हे निश्चित.

Webtitle : mahavikas aaghadis thackeray government to face floor test on saturday

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com