महावितरणचे वसुलीचे टार्गेट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

मुंबई - वीज ग्राहकांकडून मे व जून महिन्यात विजेचा सर्वाधिक वापर होतो. त्यामुळे जून व जुलै महिन्यात होणाऱ्या बिलाची रक्कम अधिक मोठी असते. या सर्व बिलांची योग्य वसुली झाली नाही तर महावितरणची थकबाकी वाढत जाते. या सर्व बाबी टाळण्याकरिता जनमित्रांनी दोन महिन्यांहून अधिक काळ चालू थकबाकी असलेल्या किमान दहा ग्राहकांची तत्काळ वीज जोडणी तोडावी, असे आदेश भांडुप नागरी परिमंडळाचे मुख्य अभियंता (प्रभारी) रफिक शेख यांनी दिले आहेत.

मुख्य अभियंता (प्रभारी) रफिक शेख म्हणाले की, दोन महिन्यांहून अधिक काळ चालू थकबाकी असलेले जास्तीत जास्त पाच ते दहा ग्राहकांचे उद्दिष्ट लाईन स्टाफला दररोजचे देण्यात यावे. लाईन स्टाफने दिलेले काम योग्यप्रकारे केले तरच त्यांचा पगार करण्यात यावा. कामचुकार कर्मचाऱ्यांना तत्काळ नोटीस देण्यात यावी. त्यांचे पगार थांबवावेत. दररोजच्या कामाची नोंद वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठेवावी. त्यांचा पगार हा त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कामावर अवलंबून राहणार असून, शाखा कार्यालयांकडून अपेक्षित काम झाले तरच त्यांचा पगार होणार आहे. थकबाकी वसुलीबरोबरच ग्राहकांना चांगली सेवा पुरवण्याकडे लक्ष द्यावे, असा आदेशही मुख्य अभियंता (प्रभारी) रफिक शेख यांनी दिले आहेत.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पावणेचार लाख थकबाकीदार
भांडुप नागरी परिमंडळांतर्गत मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरातील सुमारे १८ लाखांहून अधिक ग्राहक आहेत. भांडुप नागरी परिमंडळांतर्गत सुमारे तीन लाख ७५ हजार ग्राहकांकडे मेअखेर १६५ कोटी ८८ लाख इतकी चालू थकबाकी आहे. यामध्ये ठाणे मंडळामधील दोन लाख ११ हजार ग्राहकांकडे १११ कोटींची, तर वाशी मंडळातील एक लाख ६५ हजार ग्राहकांकडे ५४ कोटी ७८ लाख इतक्‍या चालू थकबाकीचा समावेश आहे.

राज्यभर वसुलीचे सत्र
महावितरणची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून, थकबाकी वसुलीशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यासाठी सातत्याने वीजबिल वसुली मोहिमा राबवून विशेषतः कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करून ग्राहकांच्या थकबाकी वसुलीबरोबरच चालू वीजबिल पूर्णपणे वसूल व्हावे, यावर लक्ष केंद्रित करावे. ज्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे, त्यांचे क्रॉस चेकिंग करून जर काही ग्राहक गैरमार्गाने वीज घेत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश महावितरणच्या चार प्रादेशिक संचालकांसह सर्व  परिमंडळातील मुख्य अभियंता व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिले आहे.

Web Title: mahavitaran recovery target