प्रथम भूमिपुत्रांचे पैसे द्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

उरण: स्वतःला भूमिपुत्रांचे कैवारी म्हणवून घेणाऱ्या शेकापच्या विवेक पाटील यांनी कर्नाळा बॅंकेच्या ठेवीदारांना कंगाल केले आहे. ठेवीदारांचे पैसे परत करा, नाही तर हीच जनता तुम्हाला धडा शिकवील, असा घणाघात भाजप नेते महेश बालदी यांनी जासई-दास्तान फाटा येथे केला.

जासई-दास्तान फाटा येथील शिवसमर्थ स्मारकाजवळ कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बालदी बोलत होते. या वेळी त्यांनी शेकापवर जोरदार टीकास्त्र सोडले. शेकापने शेतकरी, कामगारांचा विचार केला नाही. त्यांना आता स्थानिक भूमिपुत्रांची आठवण होत आहे. त्यामुळे पाटील यांना जनतेकडे मत मागण्याचा अधिकार नाही, असेही त्यांनी सांगितले. 

शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर यांनी पाच वर्षांत जनहिताचे कुठलेही काम केले नाही. भाजपने केलेल्या कामांचे श्रेय ते घेत आहेत, असा थेट आरोप त्यांनी केला. 

माझ्यावर परप्रांतीय म्हणून टीका करणाऱ्या विरोधकांनी मी या उरणच्या मातीत वाढलेला खरा उरणकर असून जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारा या जनतेचा पुत्र आहे असल्याचे त्यांनी म्हटले.

 या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, अरुण भगत, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, विनोद साबळे, उद्योजक पी. पी. खारपाटील, कौशिक शहा आदी मान्यवरांसह हजारो कार्यकर्ते          उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahesh baladi criticize to vivek patil