महेश भागवतांचे उल्लेखनीय कार्य

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

मुंबई - तेलंगणातील मराठी आयपीएस अधिकारी महेश मुरलीधर भागवत यांचा कॅनडातील एसेंट या सामाजिक संस्थेने महिलांची तस्करी आणि गुलामगिरीसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या जगभरातील शंभर जणांमध्ये समावेश केला आहे. यापूर्वी अमेरिकेनेदेखील गेल्या वर्षी मानवी तस्करीविरोधात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ट्रॅफिकिंग इन पर्सन रिपोर्ट हिरो ऍवार्ड देऊन गौरव केला आहे. महेश भागवत सध्या हैदराबादमधील राचकोंडाचे पोलिस आयुक्त म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत. ते मूळचे नगर जिल्ह्यातल्या पाथर्डीचे आहेत. महेश भागवत हे गेल्या 13 वर्षांपासून मानवी तस्करीविरोधात लढत आहेत.
Web Title: mahesh bhagwat