आलियाला जीवे मारू; महेश भट्ट यांना धमकी

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मार्च 2017

महेश भट्ट यांनी सुरवातीला या धमकीकडे दुर्लक्ष केले. पण, नंतर त्यांच्या व्हॉट्सअॅपवर पुन्हा धमकी देण्यात आली. त्या व्यक्तीने भट्ट यांना खात्यावर पैसे जमा करण्यास सांगितले आहे.

मुंबई - बॉलिवूडमधील दिग्दर्शक महेश भट्ट यांना खंडणीसाठी धमकीचा फोन आला असून, खंडणी न दिल्यास मुलगी आलिया भट्ट व त्यांची पत्नी सोनी राजदान यांना जीवे मारू असे धमकाविण्यात आले आहे.

महेश भट्ट यांनी या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. खंडणी मागणाऱ्या व्यक्तीने 50 लाख रुपये न दिल्यास आलिया भट्ट आणि सोनी राजदान यांनी जीवे मारू असे म्हटले आहे. महेश भट्ट यांना 26 फेब्रुवारीला हा धमकीचा फोन आला होता. खंडणी मागणारा व्यक्ती गँगचा सदस्य असल्याचे सांगत होता, असे भट्ट यांनी म्हटले आहे.

महेश भट्ट यांनी सुरवातीला या धमकीकडे दुर्लक्ष केले. पण, नंतर त्यांच्या व्हॉट्सअॅपवर पुन्हा धमकी देण्यात आली. त्या व्यक्तीने भट्ट यांना खात्यावर पैसे जमा करण्यास सांगितले आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत. 

Web Title: Mahesh Bhatt receives extortion call,caller also threatened to kill Soni Razdan and Alia Bhatt