महेश भट्ट यांना धमकाविणाऱ्यास कोठडी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मार्च 2017

मुंबई - ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांना खंडणीसाठी धमकाविणाऱ्या आरोपी संदीप साहू (वय 27) याला अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी 10 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मुंबई - ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांना खंडणीसाठी धमकाविणाऱ्या आरोपी संदीप साहू (वय 27) याला अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी 10 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

महेश भट्ट आणि अभिनेत्री आलिया भट्ट हिला जिवे मारण्याची धमकी साहूने दिली होती. लखनौ पोलिसांनी साहूला शुक्रवारी (ता. 3) अटक करून शनिवारी मुंबईत आणले. आज दुपारी त्याला किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. गुंड बबलू श्रीवास्तव याच्या नावाने त्याने भट्ट यांच्याकडे 50 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत, असे न्यायालयात सांगण्यात आले.

Web Title: Mahesh Bhatt threaten to custody