‘प्रकल्पग्रस्तांना माहुलला पाठवू नका’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

मुंबई - माहुल येथील प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतीमधील ३७ जणांना आतापर्यंत विविध आजारांनी जीव गमवावा लागल्याचा आरोप गुरुवारी (ता. १४) स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेना सदस्यांनी केला. यापुढे प्रकल्पग्रस्तांना माहुल येथे पाठवू नका, अशी मागणीही करण्यात आली.

महापालिकेच्या विविध प्रकल्पग्रस्तांना माहुल येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. या वसाहतींमध्ये रहिवाशांना प्राथमिक सुविधाही मिळत नाहीत.

परिसरातील रासायनिक कारखान्यांमुळे क्षय, कॅन्सरसारखे आजार होत आहेत. त्यामुळे काही वर्षांत ३७ जणांचा मृत्यू झाला. विविध समस्यांबरोबरच दूषित वातावरणामुळे या ठिकाणी राहणे अवघड होऊन बसल्याने पुन्हा झोपडपट्टीत पाठवण्याची मागणी रहिवासी करीत आहेत. यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी  केली. स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव म्हणाले की, स्थलांतरितांची अवस्था अतिशय वाईट असून केवळ मरता येत नाही म्हणून ते जगत आहेत. उपाययोजनांसाठी विशेष बैठक घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

Web Title: mahul project affected standing committee