esakal | राज्यातील अंगणवाडीतील बालकांसाठी सरकारचा 'मोठा' निर्णय...
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यातील अंगणवाडीतील बालकांसाठी सरकारचा 'मोठा' निर्णय...

साडेबारा हजार टन भाजीपाल्याचे होणार वितरण

राज्यातील अंगणवाडीतील बालकांसाठी सरकारचा 'मोठा' निर्णय...

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई, ता. 18: करोनाच्या संसर्गाचा धोका  निर्माण होऊ नये म्हणून ताळेबंदीमुळे राज्यातील बहुतांश व्यवहार ठप्प आहेत. महिला व बालकल्याण मंत्रालयांतर्गत येणा-या अंगणवाड्यांमध्ये दिले जाणारा शालेयपूर्व शिक्षण व पोषण आहारही स्थगित करण्यात आला आहे. मात्र, असे असले तरी तीन ते सहा वर्षे वयोगटांतील बालकांना घरपोच शिधा देण्यात येणार आहे. येत्या 15 दिवसांत संपूर्ण राज्यात 100 टक्के गरम ताज्या आहाराऐवजी कोरडा शिधा वाटपाचे उद्दिष्ट महिला व बालकल्याण मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आखले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीतही राज्याचा कारभार प्रभावीपणे हाकण्याचा प्रयत्न शासनातर्फे होत आहे. या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह अमरावती येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील सर्व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) यांच्याशी संपर्क साधून आढावा घेतला. 

BLOG - 'कंटेजियन' ९ वर्षांपूर्वीच बनलेला 'कोरोना'वर आधारित हुबेहुब चित्रपट....

करोनामुळे अंगणवाड्यांमध्ये तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुलांना दिले जाणारे शालेयपूर्व शिक्षण व पोषण आहार हे उपक्रम सध्या बंद आहेत. मात्र, बालकांच्या पोषण आहारात खंड पडू नये यासाठी त्यांना घरपोच शिधा देण्याचे आदेश यशोमती ठाकूर यांच्यातर्फे देण्यात आले आहेत. गरम ताज्या आहाराऐवजी बालकांना 15 मे पर्यंत घरपोच शिधा (टीएचआर) दिला जाणार आहे. महाराष्ट्र कन्झ्युमर्स फेडरेशन लिमिटेडतर्फे हा शिधा पोहोचवला जाणार आहे. आतापर्यंत संपूर्ण राज्यात 40 टक्के पुरवठा झाला असून येत्या 15 दिवसांत राज्यभरात 100 टक्के शिधापुरवठा केला जाणार आहे. शिधा घरपोच देताना सामाजिक दूरीचे काटेकोर पालन केले जात असून मास्क व हँडग्लोव्हजचा वापर केला जात आहे. अंगणवाडी सेविका लाभार्थी बालकाच्या पालकांना अंगणवाडीत बोलावून पॅकिंग स्वरूपातील शिधा देत आहेत.

4 मे पासून एअर इंडियाच्या विमानांचं बुकिंग सुरु, 4 मेपासून देशांतर्गत विमानसेवेला होणार सुरुवात?

या कॉन्फरन्समध्ये महिला व बालविकास सचिव  आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास योजना  इंद्रा मालो, महिला व बालविकास आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रद्धा जोशी, बाल हक्क आयोगाच्या सदस्य सचिव  सीमा  व्यास, राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव  आस्था लुथरा आदी सहभागी झाले. 

major decision for the kids of anganwadi taken by government of maharashtra

loading image