'जलयुक्तची मूळ संकल्पना अयशस्वी...' युनिक फाउंडेशनचं धक्कादायक निरीक्षण...

'जलयुक्तची मूळ संकल्पना अयशस्वी...' युनिक फाउंडेशनचं धक्कादायक निरीक्षण...

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गाजावाजा करुन जलयुक्त शिवार योजनेसाठी स्वतःची पाठ थोपटून घेतली खरी, मात्र या योजनेचा मुख्य उद्देशच साध्य झाला नसल्याचा अभ्यास समोर आलाय. युनिक फाउंडेशनने या योजनेचा अभ्यास  केला असून अनेक धक्कादायक निरीक्षणे यात नोंदवली गेली आहेत.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेली जलयुक्त शिवार योजना केवळ कागदावरच राहिला का? हा प्रश्न विचारायचं कारण म्हणजे पुण्यातील युनिक फाउंडेशननं केलेला अभ्यास. ही योजना पारदर्शी आहे, लोकसभागाची आहे. इतकंच काय तर दुष्काळ मुक्ती करणारी आहे. असे एक ना अनेक दावे केले गेले. मात्र युनिक फाउंडेशननं केलेल्या अभ्यासातून हे सगळे दावे फोल ठरल्याचं दिसतंय.

जलयुक्तच्या त्रुटी

  • - जलयुक्तची मूळ संकल्पना अयशस्वी
  • - गाव या घटकामुळे कामावर मर्यादा
  • - ग्रामसभेला नगण्य अधिकार
  • - अत्यल्प लोकसहभाग
  • - लोकसहभागास मर्यादा
  • - रोजगाराचा प्रश्न सुटत नाही
  • - पाणी व्यवस्थापन आणि नियोजनाचा अभाव
  • - माथा ते पायथा तत्त्वास मूठमाती
  • - गाव निवडीचे राजकारण
  • - सदोष आणि जुजबी स्वरूपातील अंमलबजावणी
  • - मशीनचा अतिवापर
  • - योजनेचे सरकारीकरण
  • - कंत्राटी संस्कृती
  • - गावे कागदोपत्री दुष्काळमुक्त
  • - पारदर्शकतेचा अभाव

अशी जलीयुक्त योजनेची पोलखोल करणारी निरीक्षणे युनिकनं नोंदविली आहेत. 

जलयुक्त शिवार योजनेवर ताशेरे ओढण्याची ही पहिलीच वेळ नाही. जलसंधारण अभ्यासकांनीही याआधी योजनेचे वाभाडे काढलेत. त्यातच युनिक फाउंडेशनचा हा अहवाल डोळ्यात झणझणीत आंजन घालणारा आहे.

Major faults in jalyukt shivar scheme of started by Fadnavis government

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com