मच्छीमारांना ‘महा’फटका

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

क्‍यार वादळाच्या प्रभावाने उद्‌भवलेल्या ‘महा’ चक्रीवादळात खोल समुद्रात पर्ससीन पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बोटी सापडल्याने ५० पर्ससीन बोटींचा ताफा डहाणू खाडी बंदराच्या आश्रयाला आला आहे.

डहाणू: क्‍यार वादळाच्या प्रभावाने उद्‌भवलेल्या ‘महा’ चक्रीवादळात खोल समुद्रात पर्ससीन पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बोटी सापडल्याने ५० पर्ससीन बोटींचा ताफा डहाणू खाडी बंदराच्या आश्रयाला आला आहे.

या पर्ससीन बोटी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई आणि काही गुजरातमधील असल्याचे मच्छीमारांकडून सांगण्यात आले. यातील काही बोटींवर क्रमांक अथवा नावेही नसल्याने अशा बेकायदा पर्ससीन पद्धतीने मच्छीमारी करणाऱ्या बोटींवर कारवाई करण्याची मागणी ज्येष्ठ मच्छीमार नेते आणि गुंगवाडा मच्छीमार सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष अशोक अंभिरे यांनी डहाणू खाडीच्या तटावरच असलेल्या तटरक्षक दल आणि सीमा शुल्क विभाग कार्यालयाकडे केली आहे.

समुद्री पट्ट्यात मासेमारीवर बंदी आहे. या बंदीला न जुमानता हे पर्ससीन बोटमालक समुद्रात विनापरवानगी मासेमारी करत असल्याचे अंभिरे यांनी म्हटले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: major loss of fishermen