ठाण्यातील रायलादेवी तलावाचा 'मेकओव्हर'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

ठाण्यातील वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलावाची रया गेलेली आहे. या तलावाचे सुशोभिकरण नक्की कोणी करायचे, यावरून पालिका आणि एमआयडीसीमध्ये वाद होता. पण हा वाद अखेर शमल्यानंतर रायलादेवी तलावासाठी तब्बल 10 कोटी रुपये खर्च करून या तलावाचे रुपडे पालटले जाणार आहे. एमआयडीसी आणि ठाणे महापालिका यांच्यातील हस्तांतरणाच्या प्रक्रियेवरून गेल्या अनेक वर्षांपासून या तलावाच्या सुशोभिकरणाचे काम रखडले होते. पण आता या कामाला गती मिळाली आहे. 

ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलावाची रया गेलेली आहे. या तलावाचे सुशोभिकरण नक्की कोणी करायचे, यावरून पालिका आणि एमआयडीसीमध्ये वाद होता. पण हा वाद अखेर शमल्यानंतर रायलादेवी तलावासाठी तब्बल 10 कोटी रुपये खर्च करून या तलावाचे रुपडे पालटले जाणार आहे. एमआयडीसी आणि ठाणे महापालिका यांच्यातील हस्तांतरणाच्या प्रक्रियेवरून गेल्या अनेक वर्षांपासून या तलावाच्या सुशोभिकरणाचे काम रखडले होते. पण आता या कामाला गती मिळाली आहे. 

कल्याणमधील रिंगरोड प्रकल्पाला ब्रेक 

गेल्या वर्षी निधीच उपलब्ध नसल्याने या तलावाचे सुशोभिकरण रखडले होते. मात्र या कामासाठी निधी उपलब्ध झाल्यानंतर त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी रायलादेवी तलावाच्या संवर्धनाचे भूमिपूजन करण्यात आले होते.

गेल्या महिनाभरात या तलावातील गाळ काढण्यात आला आहे. त्यानंतर आता तलावाची पातळी वाढविली जाण्याबरोबच सुशोभिकरणाची इतर कामे केली जाणार आहेत. तलावाचे शुद्धीकरण करण्याबरोबरच आजूबाजूचा परिसरात पालिकेकडून आकर्षक रंगरंगोटी केली जाणार आहे. 

दरम्यान, तलावातील संपूर्ण गाळ काढण्यात आला आहे. तलावाच्या भोवती टो-वॉल बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर कडेला मोठी भिंत बांधली जाणार आहे. नागरिकांना फिरण्यासाठी तलावाच्या भोवती पाथवे, छोटे अम्पी थिएटर तयार करण्यात येणार आहे. वागळे इस्टेट परिसरातील नागरिकांना फिरण्यासाठी विरंगुळ्याचे प्रमुख स्थान होण्यासाठी आवश्‍यक त्या सुविधा या तलावाभोवती महापालिकेकडून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. 

सावधान केवायसीमुळे व्हाल कंगाल 

गेल्या वर्षी रायलादेवी तलावाचे संवर्धन करण्याचा प्रस्ताव तयार करून त्याला मंजुरी घेण्यात आली होती. तलावाच्या संवर्धनासाठी ठाणे पालिकेने 8 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दर्शवली होती. संवर्धनाच्या माध्यमातून पाण्याची गुणवत्ता वाढवण्याबरोबरच तलावाच्या पाण्याची गळती थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

या तलावाचे संवर्धन करताना वेगवेगळ्या जातीचे पक्षी या तलावाभोवती येण्यासाठी तशा प्रकारचे वृक्ष लावण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. मात्र त्यानंतर ही घोषणा गेले वर्षभर कागदावरच राहिली होती. तब्बल वर्षभरानंतर आता या कामाला मुहूर्त मिळाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Makeover' of Railadevi lake in Thane