मालाडला बहरले वन उद्यान! 67 प्रजातींची 4 हजार झाडे, 25 हेक्टरवर जंगलच

मालाडला बहरले वन उद्यान! 67 प्रजातींची 4 हजार झाडे, 25 हेक्टरवर जंगलच

मुंबई: अतिक्रमणातून भूखंड मुक्त करुन महानगर पालिकेने मालाड मधील 25 हेक्टरहून अधिक क्षेत्रफळाच्या भुखंडावर नंदनवन फुलवले आहे. मालाड पश्‍चिम येथील भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम वन उद्यानात 67 प्रजातींचे तब्बल 4 हजार झाडे आहे. हे वन उद्यान भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापेक्षाही मोठे आहे.

महानगर पालिकेने 2013 मध्ये या भुखंडावरील अतिक्रमण काढून तेथे उद्यान तयार करण्यास सुरुवात केली. गेल्या 6 ते 7 वर्षाच्या काळानंतर हे उद्यान आता पूर्ण बहरले आहे. या वन उद्यानात तब्बल 2 किलोमीटरचा लांबीचा पाथवेही तयार करण्यात आला आहे. वनासारखी परिस्थिती असावी म्हणून सिमेंट,डांबर अशा प्रकारचा वापर कमी करण्यावर भर दिला आहे. येथे झाडांचे 5 विभाग तयार करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने देशी झाडे लावण्यात आली आहे. कोकणात आढळणारी झाडे, औषधी वनस्पती, समुद्र किनाऱ्यावरील झाडे, फळ, फुलं झाडे, मोठी सावली देणारी अशी झाडे आहेत. त्यामुळे फक्त नागरिकांसाठीच हे वन उद्यान आकर्षण ठरत नसून पक्षी आणि इतर जिवांसाठीही या उद्यानांचा आसरा झाला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आसन व्यवस्थाही करण्यात आली आहे. फुलपाखरे किटक आकर्षित व्हावी या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात आले असून त्याचे चांगले परिणाम दिसत असल्याचेही पालिकेकडून सांगण्यात आले.

मनोरंजन मैदान उद्यानाचे आरक्षण असलेल्या या भुखंडावर 550 च्या आसपास झोपड्या होत्या. त्यांच्यावर कारवाई करुन 2013 मध्ये या झोपड्या महापालिकेने हटविल्या. हा भूखंड उंच सखल असल्याने तेथे उद्यान विकसित करणे आव्हान होते. मात्र महापालिकेने योग्य पध्दतीने नियोजन करुन मुंबईत वन उद्यान साकारले आहे, असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. भायखळा येथील प्राणीसंग्रहालय हे 20 हेक्टर क्षेत्रफळावर वसले आहे. हे उद्यान 25 हेक्टरवर तयार झाले आहे.

हे वन उद्यान पर्यटक लहान मुले यांच्यासह पक्षी किटक यांच्यासाठी आकर्षण आहे. त्याचबरोबर आंबा, काजू ,रतांब (कोकम), नारळ, सिताफळ, जांभूळ या कोकणात आढळणाऱ्या झाडांसह समुद्रफुल सिल्वर ओक अशी किनाऱ्यावरील झाडे, वड पिंपळ अशी मोठी झाडे आणि रक्तचंदन, अर्जुन कडूलिंब अशा प्रकारची औषधी झाडे औषधी वनस्पतीचे आहेत. यामुळे उद्यानत पक्षी, किटकांचा वावर वाढल्याने झाड तसेच सजीवांचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनाही पर्वणी मिळाली आहे.

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Malad Forest Park 4 thousand trees 67 species forest on 25 hectares

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com