मालाड मध्ये प्लास्टीकच्या गोदामाला आग 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

मालाड पश्‍चिम येथील इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये भीषण आग लागली असून आतापर्यंत ही आग आटोक्‍यात आलेली नाही.

मुंबई : मालाड पश्‍चिम येथील इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये भीषण आग लागली असून आतापर्यंत ही आग आटोक्‍यात आलेली नाही. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गोदामातील प्लास्टीकला आग लागली आहे. 

पश्‍चिमेकडील काच पाडा मामलेदार वाडीतील तीन मजली इंडिस्ट्रीयल इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गोदामात रात्री 8 वाजल्याच्या सुमारास अचानक आगीचा भडका उडाला. गोदामात प्लास्टीक व इतर ज्वलनशील वस्तु असल्याने आग प्रचंड वेगाने भडकू लागली.आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी पोहचले. मात्र,ज्वलनशील साहित्यामुळे आगीची व्याप्ती वाढतच गेली. 

रात्री 10 वाजल्याच्या सुमारास आठ बंबाचे पाचारण करण्यात आले. आठ बंब, सहा वॉटर जेटच्या सहाय्याने अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र,प्लास्टीक जळल्यामुळे प्रचंड धुर पसरला असल्याने आग नियंत्रणात आणणे अवघड होत होते.  

 web title : in malad Godown catch fire


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in malad Godown catch fire