मालेगाव बॉम्बस्फोट; साक्षीदारांची यादी सादर करण्याचे निर्देश

Court
Court

मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील साक्षीदारांची यादी गोपनीय ठेवता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. ही यादी सीलबंद लिफाफ्यात सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) दिले.

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची नियमित सुनावणी विशेष न्यायालयात सुरू आहे. खटल्यातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याने उच्च न्यायालयात दोषमुक्तीसाठी याचिका केली आहे. या याचिकेवर सोमवारी न्या. आय. एम. महंती आणि न्या. ए. एम. बदर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. अभियोग पक्षाकडून साक्षीदारांची यादी दिली जात नाही, असे या वेळी सांगण्यात आले. सर्व साक्षीदारांची नावे गुप्त ठेवता येणार नाहीत. त्यामुळे गोपनीय साक्षीदारांची यादी आठवडाभरात दाखल करावी, असे निर्देश खंडपीठाने दिले. मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू आणि 100 हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com