प्रज्ञासिंह ठाकूर यांना दिलासा नाही

pragya singh thakur
pragya singh thakur

मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांना सोमवारी विशेष न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. लोकसभा सदस्यत्वाची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी सुनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी देण्याची त्यांची मागणी न्यायालयाने फेटाळली. या कारणावरून आरोपीला गैरहजर राहण्याची मुभा मिळणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

मालेगावमध्ये दहा वर्षांपूर्वी घडलेल्या बॉम्बस्फोट खटल्यात मुख्य आरोपी असलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर सध्या जामिनावर असून, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निवडून आल्या आहेत. विशेष न्यायाधीश विनोद पडळकर यांनी या खटल्याच्या सुनावणीला आठवड्यातून किमान एक दिवस हजर राहण्याचा आदेश त्यांना यापूर्वी दिला आहे. परंतु, प्रज्ञासिंह यांच्या वतीने खटल्याला गैरहजर राहण्याची परवानगी मागणारा अर्ज सोमवारी न्यायालयात करण्यात आला. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर संबंधित कार्यवाही पूर्ण करायची आहे; त्यामुळे खटल्याच्या सुनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी द्या, अशी मागणी त्यांनी केली होती. 

खटल्याच्या या टप्प्यात साक्षीदारांचे जबाब नोंदवणे सुरू आहे. अशा वेळेस निवडणूक, खासदारकीचे कामकाज आदी कारणांस्तव गैरहजर राहण्याची मुभा दिली जाणार नाही, असे विशेष न्यायालयाने स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com