माळशेज घाट बंदमुळे बाजारपेठ महागली

नंदकिशोर मलबारी  
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

सरळगांव : माळशेज घाटात दरड कोसळल्याने 3 दिवसानंतरही घाटातील वाहातूक सूरू न झाल्याने मुरबाड तालुक्यात भाजिपाल्याचे भाव कडाडले असून या मार्गवरून  प्रवास करणाऱ्यां प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील हातावर पोट भरणाऱ्या छोट्या व्यवसाय करणाऱ्यांनाही याचा आर्थिक फटका बसला आहे.

मंगळवारी (ता 20) पहाटे 2.30 वाजता घाटात दरड कोसळल्याने या घाटातील वाहातूक पूर्णपणे बंद झाली होती. त्यामळे या मार्गाने जाणाऱ्या वाहान चालकांना व प्रवाशी जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. दोन चार तासात पुन्हा घाटातील वाहातूक सूरू होईल या आशेवर बसलेले भाजीपाला, दूध, कोंबडी वाहातूक करणाऱ्या वाहान चालकांना माल असलेल्या मालकांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागला.

तालुकात भाजीपाल्याचे भाव कडाडले
घाटातील वाहातूक मंगळवार या दिवसी बंद झाल्याने घाट मार्गे सरळगाव व शिवळे येथे भरणाऱ्या आठवडी बाजारात भाजीपाला विक्री साठी न आल्याने याचा फटका ग्राहकांना बसला. या दोन्ही ठिकाणाहून पूर्ण आठवड्याचा भाजीपाला ग्राहक नेत असतो. मात्र घाट बंद असल्याने बाजारात आलेला भाजीपाला  दुसऱ्या ठिकाणाहून आल्यान तो चढ्या भावाने खरेदी करावा लागला. बंद घाटाचा फटका तालुक्यातील सर्वसाधारण ग्राहकांना भोगावा लागला.

बंद घाटाचा व्यवसायिकांनाही फटका
घाटात येणारे पर्यटक व या घाटातून प्रवास करणारे प्रवासी नाश्ता, व जेवणासाठी या रस्त्यावर असलेले धाब्यावर थांबत असल्याने हॉटेल व्यावसायीक  बऱ्यापैकी आर्थिक फायदा करून घेत होते. मात्र तिन दिवस घाट बंद असल्याने या व्यवसायिकांनाही आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. अजून किती दिवस घाट बंद राहातो याची माहीती मिळत नसल्याने व्यवसायिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. 

Web Title: Malshej Ghat closes due to market boom