दहावीच्या विद्यार्थिनीची मालवणीत आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने दहावीतील विद्यार्थिनीने शुक्रवारी गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार मालवणीत घडला. शुक्रवारी सायंकाळी शिल्पा कुंदर (वय 17) या दहावीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेतला. 

मुंबई : अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने दहावीतील विद्यार्थिनीने शुक्रवारी गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार मालवणीत घडला. शुक्रवारी सायंकाळी शिल्पा कुंदर (वय 17) या दहावीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेतला. 

गळफास घेतलेल्या अवस्थेत ती घरात आढळली. तिला शताब्दी रुग्णालयात नेले असता डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. शिल्पाला दहावीत 90 टक्‍क्‍यांच्यावर गुण मिळण्याची अपेक्षा होती; मात्र प्रत्यक्षात तिला 71 टक्के गुण मिळाले. त्यामुळे तिचा हिरमोड झाला होता. निकाल लागल्यावर ती रडत घरी आली होती, आईने तिची समजूत काढली. सायंकाळी आई दुकानावर गेली असता तिने गळफास घेतला, अशी माहिती पोलिसांनी दिली. खारोडीतील लक्ष्मी चाळीत ही घटना घडली. या प्रकरणी मालवणी पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. 

Web Title: In Malvani Class X students Suicide