'मालवणी'च्या सूत्रधाराला अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

ठाणे - मुंबईतील मालवणी परिसरातील विषारी दारूकांडातील 106 व्यक्तींच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी धर्मेंद्रसिंग शिवबलीसिंग तोमर ऊर्फ संजयसिंग (वय 39) याला ठाणे पोलिसांनी मध्य प्रदेशातील इंदूरमधून अटक केली.

ठाणे गुन्हे शाखा घटक-1 च्या पथकाने ही कारवाई केली असून, तो ठाणे शहरातील दारूभट्ट्यांना विषारी द्रव्यांचे मिश्रण पोचविण्याचे काम करीत असल्याचे उघड झाले आहे. या आरोपीने मालवणीतील दारू बनविण्यासाठी केमिकलचा पुरवठा केल्याची कबुली पोलिसांना दिली. दोन वर्षांपासून तो मुंबई पोलिसांना हवा होता. त्याला शिळ-डायघर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी 25 मेपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.

Web Title: malvani main criminal arrested