ममता कुलकर्णीची मालमत्ता जप्त होणार 

किशोर कोकणे
गुरुवार, 10 मे 2018

ठाणे - अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी फरारी आरोपी अभिनेत्री ममता कुलकर्णी हिची अंधेरीतील मालमत्ता तीन आठवड्यात सील केली जाईल, अशी माहिती माहिती विशेष सरकारी वकील शिषिर हिरे यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच ठाणे न्यायालयाने तिची मालमत्ता जप्तीचे आदेश दिले होते. 

ठाणे - अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी फरारी आरोपी अभिनेत्री ममता कुलकर्णी हिची अंधेरीतील मालमत्ता तीन आठवड्यात सील केली जाईल, अशी माहिती माहिती विशेष सरकारी वकील शिषिर हिरे यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच ठाणे न्यायालयाने तिची मालमत्ता जप्तीचे आदेश दिले होते. 

ठाणे पोलिसांनी 2016मध्ये इफ्रेडीन पावडरच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचे मोठे रॅकेट उद्‌ध्वस्त केले होते. दोन हजार कोटींच्या या रॅकेटमध्ये अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा पती विक्की गोस्वामी यांची नावे उघड झाली होती. दोन वर्षांपासून पोलिस तिचा शोध घेत आहेत; मात्र ती नेमकी कुठे आहे याची माहिती मिळत नसल्याने न्यायालयाने तिला आणि तिच्या पतीला फरारी घोषित केले. पोलिसांनी तिच्या निवासस्थानी नोटीसही बजावली, यानंतरही ते हजर राहिले नाहीत. 

विशेष सरकारी वकील शिषिर हिरे यांनी ममता कुलकर्णीची मामित्ता जप्त करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार 17 एप्रिलला विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एच. एम. पटवर्धन यांच्यापुढे या प्रकरणाची सुनावणी केली. या दोन्ही आरोपींना पुरेसा वेळ दिल्याचे निरीक्षण नोंदवत ममता कुलकर्णीचे अंधेरीतील तीन फ्लॅट जप्त करण्याचे आदेश त्यांनी दिले. 

या फ्लॅट्‌सला सील ठोकण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. तीन आठवड्यात तिचे अंधेरीतील वर्सोवा भागातील फ्लॅट जप्त करण्यात येतील, अशी माहिती ऍड. हिरे यांनी दिली. कारवाईसाठी अधिकृत नोटीस लवकरच मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर ही कारवाई करू, अशी माहिती ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय गोडसे यांनी दिली. 

20 कोटींची माया 
ममता कुलकर्णीचे अंधेरी-वर्सोवा भागात "स्काय इन्क्‍लेव्ह' या संकुलात तीन फ्लॅट आहेत. यातील पहिल्या मजल्यावर एक, दुसऱ्या मजल्यावर एक आणि सातव्या मजल्यावर एक, असे तीन फ्लॅट्‌स आहेत. या फ्लॅट्‌सची एकूण किंमत 20 कोटी रुपये इतकी आहे.

Web Title: Mamta Kulkarni assets will be seized Drug racket case